Rashmika Mandanna । डिपफेक व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या अटक होताच रश्मिकाने दिली प्रतिक्रिया

Rashmika Mandana

Rashmika Mandanna । प्रसिद्ध भारतीय सिने अभिनेत्री रश्मिका मंदाना हिच्या डीपफेक व्हिडिओ प्रकरणात दिल्ली पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीला पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केली आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी 10 नोव्हेंबर 2023 रोजी एफआयआर नोंदवला होता आणि तेव्हापासून आरोपीचा शोध सुरू होता.

Bank Of Baroda Recruitment । तरुणांनो, ‘या’ बँकेत सुरु आहे मेगा भरती, लाखो रुपयांचा पगार पाहिजे असेल तर लगेचच करा अर्ज

एएनआयच्या वृत्तानुसार, दोन महिन्यांच्या सखोल तपास आणि डिजिटल फूटप्रिंटच्या आधारे पोलीस मुख्य आरोपीपर्यंत पोहोचले आहेत. त्यासाठी पोलिसांच्या विशेष कक्षाने आयपी अॅड्रेसच्या माध्यमातून हा व्हिडीओ सर्वप्रथम कोठून तयार केला आणि तो कुठून अपलोड केला, याचा शोध घेतला असल्याची माहिती मिळत आहे. आता आरोपीला पोलिसांनी अटक केल्यानंतर अभिनेत्री रश्मिका मंदाना हिने यावर प्रतिक्रिया दिली आहे. रश्मिकाने याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. (Rashmika Mandanna On Deepfake Video)

Ayodhya Ram Mandir । मोठी बातमी! अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेनिमित्त दिलेली सार्वजनिक सुट्टी रद्द होणार?

पाहा रश्मिकाचे ट्विट (Rashmika Mandanna Tweet)

“माझा व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या आरोपीला अटक केल्याबद्दल @DCP_IFSO धन्यवाद. ज्या समाजाने मला प्रेमाने, पाठिंब्याने स्वीकारले आणि माझे संरक्षण केले त्यांच्याबद्दल खरोखर कृतज्ञ आहे. जर तुमचा फोटो तुमच्या संमतीशिवाय कुठेही वापरली किंवा मॉर्फ केली असेल. हे चूक आहे! सर्व मुला-मुलींनी ऐकावे, जर तुमचा फोटो कोणत्याही प्रकारे तुमची प्रतिमा डागाळण्यासाठी वापरला जात असेल तर ते पूर्णपणे चुकीचे आहे आणि तुम्ही विशेष काळजी घेतली पाहिजे की तुमच्या आजूबाजूला अनेक चांगले लोक तुमच्या पाठीशी आहेत. जे तुम्हाला मदत करतील”. असे ट्विट अभिनेत्रीने केले आहे. सध्या हे ट्विट चर्चेत आहे

Ajit Pawar । ‘बाबांनो तुम्ही दोन किंवा एक अपत्यावर थांबा’, अजित पवारांनी भरसभेत केली विनंती

Spread the love