Nashik: नाशिकमध्ये टोलनाक्याच्या विरोधात सर्वपक्षीय नेत्यांचे रास्ता रोको आंदोलन, केल्या ‘ या ‘ विविध मागण्या

Rasta Roko Andolan of all party leaders against toll booths in Nashik, made various demands

नाशिक : सर्वपक्षीय नेत्यांकडून नाशिक(Nashik) पेठ या राष्ट्रीय महामार्गावर चाचडगाव जवळ असलेल्या टोल नाक्यावर (Tolnaka)रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.हे आंदोलन तब्बल दोन तास चालले होते.पेठमधील नागरिकांना टोल माफ करण्यात यावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

दोन तासानंतर आंदोलनादरम्यान उपस्थित दिंडोरी व पेठचे उपविभागीय अधिकारी डॉ. संदीप आहेर (Dr.Sandeep Aher) आणि पो. उपअधीक्षक अमोल गायकवाड (Amol Gaikwad) यांच्या समक्ष चर्चा केल्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला. या आंदोलनावेळी रस्त्यावर (Road) येणाऱ्या जाणाऱ्या सर्व वाहनांच्या लांबच लांब रांगा बघायला मिळाल्या.

पारंपारिक बैल पोळ्याचा ‘घे-या’ होतोय लुप्त…! वाचा सविस्तर माहिती

आंदोलनातील विविध मागण्या

हे रस्ता रोको आंदोलन विविध मागण्यांसाठी करण्यात आले. यामध्ये पेठ ते चाचडगाव यादरम्यान महामार्गाच्या रस्त्याची खड्डे पडून रस्त्याची चाळण झालीयं.यामुळे वाहनचालकांना अपघाता सारख्या संकटांना सामोरं जावं लागतंय. जोपर्यंत रस्त्यावरील खड्डे दूर होणार नाहीत, तोपर्यंत टो माफ करावा ही प्रमुख मागणी यावेळी आंदोलकांनी केली.तसेच रस्त्याचे काम पूर्ण करून मगच या मार्गावर टोल वसुली करावी, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली.

Ajit Pawar: “अरे आत्ता होते काय, तिथं बसायला पाहिजे,”विधानसभा अधिवेशनात अजित पवार संतापले

यावेळी भास्कर गावीत, माजी आमदार धनराज महाले, नगराध्यक्ष करण करवंदे, विशाल जाधव, याकुब शेख, जाकीर मनियार, माजी नगराध्यक्ष मनोज घोंगे, विलास अलंबाड, यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *