सरकारी कोणतेही कागदपत्र काढायचं म्हणलं की कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागतात. यावेळी अनेकदा एजंट फेऱ्या मारण्यासाठी पुन्हा पुन्हा प्रवृत्त करतात. त्यामुळे अनेक नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. त्यासाठी सरकारने ऑनलाईन पद्धतीने रेशन कार्ड काढण्याचा निर्णय घेतला आहे. व हे रेशन कार्ड आपण घरबसल्या देखील काढू शकतो. सामान्य नागरिकांना कार्यालयाच्या ज्या फेऱ्या माराव्या लागत होत्या त्या फेऱ्या न मारता आता ऑनलाईन पद्धतीने रेशन कार्ड काढू शकतो. व वेळेची बचत करू शकतो. तसेच हे रेशनकार्ड ऑनलाइन आणि निशुल्क स्वरूपात उपलब्ध होणार आहे. यामुळे सामान्य लोकांचा वेळ वाचला जाणार आहे.
रेशनकार्ड साठी राज्यातील अनेक तहसील व परिमंडळ कार्यालयांमध्ये अनेक फेऱ्या माराव्या लागत असत. व सामान्य लोकांकडून पैसे वसूल केले जायचे. यामध्ये अधिकाऱ्यांचा देखील समावेश असायचा. सामान्य नागरिकांना जे रेशन कार्ड 20 रुपयाला मिळायचे ते अधिकाऱ्यांकडून व एजंट कडून फेऱ्या मारून दोन हजार रुपये घेऊन त्या नागरिकांना रेशन कार्ड हे उपलब्ध व्हायचे. राज्य सरकारने बुधवारी जाहीर केलेल्या शासन निर्णयानुसार आता सामान्य लोकांना ऑनलाइन आणि नि:शुल्क रेशन कार्ड काढता येणार आहे.
Ajit Pawar | त्र्यंबकेश्वर प्रकरणावरून अजित पवार संतापले; म्हणाले, अशा घटना…”
रेशनकार्ड साठी ऑनलाइन अर्ज (Online Application) केल्यानंतर त्याबाबतची माहिती संबंधित जिल्हा पुरवठा अधिकारी किंवा अन्नधान्य वितरण अधिकारी यांच्याकडे जमा होणार आहे. रेशनकार्डसाठी ऑनलाइन अर्ज (Online Application) केल्यानंतर त्याबाबतची माहिती संबंधित जिल्हा पुरवठा अधिकारी किंवा अन्नधान्य वितरण अधिकारी यांच्याकडे जमा होणार आहे. अर्ज करण्यासाठी ती व्यक्ती कोणत्या कॅटेगरीमधील आहे. यावरून त्याचं रेशन कार्ड हे किती दिवसात मिळणार ते ठरणार आहे. अर्जदार अंत्योदय योजनेतील किंवा राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील (National food security scheme) असल्यास पूर्वीप्रमाणेच रेशन अधिकारी त्याच्या कुटुंबाचा सर्व्हे ( Family Survey) करणार आहेत.
सर्वात मोठी बातमी! २००० हजारांची नोट बंद होणार; ३० सप्टेंबरपर्यंत बँकेत जमा करण्याची मुदत
अंत्योदय योजनेतील किंवा राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेमधील रेशन कार्ड देताना २० दिवसांमध्ये मिळणार आहे. व पांढऱ्या रेशन कार्डासाठी सात दिवस लागणार आहेत. रेशन कार्ड मिळाले की ते लगेच डाऊनलोड करता येईल. व रेशन माल हा कोणत्या दुकानांमध्ये उपलब्ध होईल हे देखील त्यामध्ये सांगितले जाईल.
‘केरला क्राइम फाईल्स’ वेब सीरिजचा जबरदस्त टीझर रिलीज; ‘हे’ कलाकार प्रमुख भूमिकेत