राजकीय वर्तुळात कधी काय घडेल हे सांगता येत नाही. इथे कधीही काहीही होऊ शकत. कधी काळी जवळ असलेली माणसं दूर जाऊ शकतात तर दूर असलेली माणसं अचानक उडी मारून जवळ येऊ शकतात. महाराष्ट्राच्या राजकारणात अशीच एक घटना घडली आहे, जी वाचून तुम्हाला देखील धक्का बसेल. राष्ट्रवादी चे सर्वेसर्वा शरद पवार व भाजपचे आघाडीचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात जाताना एकाच गाडीतून प्रवास केला आहे. आता यावरून अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. अनेकांनी यावर प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. यामध्येच आता संजय राऊत यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.
मोठी बातमी! कोचर दाम्पत्याला एक लाख रुपये भरून जामीन मंजूर
संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “शरद पवार राज्याचेच नव्हे तर देशाचे मोठे नेते आहेत. फडणवीसांनी त्यांच्यासोबत प्रवास केला हे कटुता संपविण्याचे पहिले पाऊल असेल. पण माझ्या माहितीप्रमाणे शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत फार काळ कटुता ठेऊ शकत नाही.”, अशी प्रतिक्रिया राऊतांनी दिली आहे.
‘या’ कारणामुळे शिंदे, फडणवीस, आणि ठाकरे एकाच व्यासपीठावर दिसणार! चर्चाना उधाण
दरम्यान, एकत्र प्रवास करताना या दोघांनी कोणत्या विषयावर चर्चा केली असेल ? याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे. अजित पवार यांच्या वक्तव्यांमुळे भाजप आक्रमक झाले असतानाच भाजप- राष्ट्रवादी मधील आघाडीच्या नेत्यांनी एकाच गाडीतून प्रवास करणे ही नव्या पक्ष आघाडीची नांदी तर नाही ना ? यावरून राज्यात चर्चा सुरू झाल्या आहेत.