
मुंबई : पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) न्यायालयीन कोठडीत आहेत . बऱ्याच वेळा राऊतांच्या कोठडीमध्ये वाढ झाली आहे. यामध्येच आता संजय राऊतांनी जामीन मिळावा यासाठी मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए कोर्टात अर्ज केला होता. आता या अर्जावर सुनावणीसाठी अनेक तारखा आल्या होत्या पण सुनावणी काही झाली नाही, यामध्येच आता एक नवीन तारीख समोर आली आहे.
शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय, ड्रॅगन फ्रुट शेतीसाठी मिळणार ‘इतके’ अनुदान
माहितीनुसार, संजय राऊतांच्या जामीन अर्जावर येत्या १० ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. त्यामुळे ही सुनावणी झाली तर राऊतांना दिलासा मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Rashmika Mandana: रश्मीकाने तिच्या चाहत्याची केली ‘ही’ विचित्र मागणी पूर्ण, व्हिडीओ झाला व्हायरल
दरम्यान, बाकी कैद्यांना ज्या प्रकारे सुविधा मिळतात त्याच सुविधा संजय राऊतांना देखील दिल्या जात आहेत. त्यांना तुरुंगात लिहिण्यासाठी लेखणी दिली गेली आहे. पण त्यांनी लिहिलेले लिखाण तुरुंगातून बाहेर जाऊ नये याची पुरेपूर काळजी कारागृह प्रशासन घेत आहे.
Chagan Bhujbal: “शाळेत सरस्वतीचा फोटो का पाहिजे?” छगन भुजबळांच्या वादग्रस्त वक्तव्याने चर्चाना उधाण