सामनातून राऊतांची टीका ; भारताची लोकशाही अंधारमय

मुंबई : शिवसेनेचे प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेले सामनाच्या रोखठोक मधून संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि एकनाथ शिंदे यांच्यावर टिपणी केली आहे. जे विधानसभेचे सदस्य शिवसेनेतून बाहेर पडले आहे. ते बोलतात आमची शिवसेना खरी आहे आम्ही शिवसेना सोडली नाही मात्र त्यांची हे वक्तव्य कातडी वाचवणारी आहे अशी टीका सामन्याच्या रोखठोक मधून संजय राऊत यांनी केली.

घटना ही माणसांसाठी असते माणसे घटनने साठी नसतात10 वेळापत्रकानुसार सोळावी आमदार अपात्र ठरतील. मात्र या सरकारला वाचवण्यासाठी व शिवसेनेला संपवण्यासाठी केंद्रातले लोक या 16 आमदारांना वाचवत आहे. मात्र सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देते याच्यावर देशाचे व लोकशाहीचे भवितव्य अवलंबून आहे असे ते सामनाच्या रोखठोक मधून म्हणाले.

भारताच्या लोकशाहीचे भविष्य अंधारमय झाले आहे असे रोजच दिसते. देशाचे सरन्यायाधीश श्री रमणा यांनी लोकशाही व संसदेच्या भविष्यावर एका कार्यक्रमात चिंता व्यक्त केली होती. विरोधी पक्षांची जागा सत्ताधारी बळकवत आहे हे लोकशाहीसाठी घातक आहे. असे सरन्यायाधीश श्री रमणा सांगतात तेव्हा भीती वाटते पण भारतात एकाधिकारशाही व हुकूमशाही यांनी किती तांडव घातला तरी लोकशाही मरणार नाही असे सामन्याच्या रोखठोक मध्ये म्हटले गेले आहे

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *