शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे नेते खासदार संजय राऊत कायम चर्चेत असतात. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे ते कायम प्रसिद्धीत असतात. दरम्यान राऊत (Sanjay Raut) यांनी नुकतेच एक वक्तव्य केले आहे, ज्यामुळे ते पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. यामध्ये त्यांनी चक्क डॉ.बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Aambedkar) यांचे नाव चुकवल्यामुळे सर्वत्र चर्चा होत आहे.
विक्रमी पीक काढल्यास शेतकऱ्यांना मिळणार 50 हजार रुपये; जाणून घ्या, काय आहे प्रक्रिया?
बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म मध्यप्रदेश येथील महू या गावात झाला आहे. परंतु, संजय राऊत यांनी बोलण्याच्या ओघात बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महाराष्ट्रात झाला असल्याचे म्हंटले आहे. राऊतांच्या या वाक्यामुळे भाजप नेत्यांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले असून त्यांच्यावर टीका केली आहे. भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी तर चक्क संजय राऊत यांच्या या विधानाचा व्हिडीओ ट्विट करत सर्वज्ञानी राऊतांचे अगाध ज्ञान असे म्हणत टोला मारला आहे.
”सुषमा अंधारे माकडीण…”, शिंदे गटाच्या महिलेची बोचरी टीका
इतकंच नाही तर, “संजय राऊत यांच अज्ञान या वक्तव्यातून कळत आहे . संजय राऊत ज्या ठाकरे गटाचे प्रतिनिधित्व करत आहेत, त्यांचं आंबेडकरांवर कधी प्रेम होतं? संजय राऊत कंपाऊंडरकडूनच औषध घेतात,” अशी टीका करत भाजप नेते अतुल भातखळकर यांनी संजय राऊत यांच्या वर्मावर बोट ठेवले आहे. कायम चर्चेत राहण्यासाठी बेसुमार बोलणाऱ्या राऊतांनी हे वक्तव्य करून स्वतःच्या अडचणींमध्ये आणखी वाढ केली आहे.
देशातील तरुण पिढी नशेखोर होण्याला केंद्र सरकार जबाबदार; नाना पटोले यांच्याकडून गौप्यस्फोट!