Crime News । ठाणे : सरत्या वर्षाला निरोप द्यायला आणि नवीन वर्षाचे (New year 2024) स्वागत करायला प्रत्येकजण आतुर आहे. ठिकठिकाणी नवीन वर्ष साजरा करण्यास हॉटेल्स बुक करण्यात आले आहेत. पर्यटनस्थळे गजबजली आहेत. अनेकांनी कोकणाला (Kokan) प्राधान्य दिले आहे. परंतु, नवीन वर्षाच्या स्वागतच्या पूर्वसंध्येला पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे. ड्रग्जसह रेव्ह पार्टीतून (Rave party) 100 जणांना ताब्यात घेतले आहे. (Latest Marathi News)
ठाण्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. ठाण्यातील घोडबंदर कासारवडवली गावाजवळ 100 लोक रेव्ह पार्टी (Rave party in Thane) करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळलेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचला. पार्टी सुरू झाल्यानंतर पोलिसांनी (Thane Police) त्या ठिकाणी धाड मारली. या छाप्यात पोलिसांनी 100 तरुणांना ताब्यात घेत अमली पदार्थ जप्त केले. धकाकदायक बाब म्हणजे यात पाच मुलींचा समावेश आहे. (Thane crime)
दरम्यान, या पार्टीमध्ये नशा करण्यासाठी एलएसडी,चरस ,गांजा,चिलीम,अल्कोहोल अशा विविध अमली पदार्थ होते. पोलिसांनी 25 मोटारसायकली जप्त केल्या आहेत. ही कारवाई ठाणे गुन्हे शाखेचे सहाय्यक शिवराज पाटील, एसीपी, युनिट पाच आणि युनिट दोन यांनी केली. कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
Ajit Pawar । “अजितराव टोपी उड जाएगी”, बड्या नेत्याचा अजित पवारांना इशारा