Ravindra Chandrashekhar | चित्रपटसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एक प्रसिद्ध अभिनेत्री सध्या कठीण काळातून जात आहे. तिच्या पतीची प्रकृती बिघडली आहे. साऊथ अभिनेत्री महालक्ष्मी हीचा पती रवींद्र चंद्रशेखरलाआयसीयू मध्ये दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.
श्वास घेण्यात अडचण
प्रसिद्ध निर्माता आणि लिब्रा प्रॉडक्शनचे मालक रवींद्र चंद्रशेखरला उपचारासाठी आठवडाभरापासून हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. इतकंच नाही तर त्याच्या तब्येतीची इतर माहितीही समोर आली आहे. रविंदर चंद्रशेखर यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. यानंतर आता त्याच्या नाकात ऑक्सिजनची ट्यूब टाकण्यात आली आहे. त्याला फुफ्फुसात भयंकर संसर्ग झाला आहे. त्यामुळे श्वास घेण्यास खूप त्रास होत आहे. त्याला 1 आठवडा आयसीयूमध्ये राहावे लागणार आहे.
Sujay Vikhe Patil । नगरकरांसाठी खासदार सुजय विखे पाटील यांनी केली सर्वात मोठी घोषणा!
लग्नामुळे ट्रोल झाले होते
महालक्ष्मीच्या पतीचे हे दुसरे लग्न होते. या लग्नापूर्वी त्याचा घटस्फोट झाला होता. 2022 मध्ये टीव्ही अभिनेत्री महालक्ष्मीशी लग्न केले. त्याचे लग्न खूप वादग्रस्त ठरले कारण सोशल मीडियावर या जोडप्याचे फोटो समोर येताच लोकांना हे जोडपे खूपच विचित्र वाटले. त्यानंतर बॉडी शेमिंगच्या सर्व प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या. महालक्ष्मीने पैशासाठी रवींद्रशी लग्न केले, असेही लोक म्हणाले.