Ravindra Dhangekar । ब्रेकिंग! काँग्रेसला मोठा धक्का; रविंद्र धंगेकरांचा काँग्रेस सोडण्याचा निर्णय, शिवसेना शिंदे गटात होणार प्रवेश

Ravindra Dhangekar

Ravindra Dhangekar । पुण्याचे काँग्रेस नेते रविंद्र धंगेकर यांनी अखेर काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी, मतदारांशी आणि समर्थकांशी सखोल चर्चा करून, त्यांनी आगामी राजकीय भविष्य निर्धारीत केलं आहे. शिंदे गटात प्रवेश करण्याबाबतच्या चर्चांना आता अंतिम रूप मिळालं आहे. धंगेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करण्याची घोषणा केली असून काँग्रेस सोडताना त्यांना वाईट वाटत असल्याचं त्यांनी सांगितलं.

Anjali Damania । सतीश भोसलेचा आणखी एक पैसे उधळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

रविंद्र धंगेकर यांचा काँग्रेसमध्ये 10-12 वर्षांचा कार्यकाळ होता, आणि यामध्ये त्यांनी अनेक पातळ्यांवर काम केलं. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीचे चर्चे सुरू झाले होते. या पार्श्वभूमीवर धंगेकर यांनी शिवसेनेचे शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत त्यांनी ‘कठीण निर्णय घेतला आहे, परंतु लोकांशी संपर्क साधला आणि सत्तेशिवाय काम करणं शक्य नाही’, असं सांगितलं.

Chhaava । ‘छावा’ चित्रपटाच्या कमाईबाबत सर्वात मोठी अपडेट समोर!

धंगेकर यांनी तसंच स्पष्ट केलं की, एकनाथ शिंदे यांनी त्यांना मदत केली आहे आणि आज संध्याकाळी शिंदे यांच्याशी भेट घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांच्या या निर्णयामुळे काँग्रेसला एक मोठा धक्का बसला आहे.

Dhananjay Munde । आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! अखेर धनंजय मुंडेंनी दिला मंत्रिपदाचा राजीनामा

Spread the love