Ravindra Dhangekar । “रवींद्र धंगेकर यांनी दोन दिवसात माफी मागावी नाहीतर…”, बड्या नेत्याचा गंभीर इशारा

Ravindr Dhangekar

Ravindra Dhangekar । पुणे हिट अँड रन प्रकरण सध्या चर्चेत आहे. अपघाताच्या दिवशी अल्पवयीन आरोपी पोर्श कार चालवत होता. नशेच्या संशयावरून आरोपीच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. परंतु रक्ताच्या अहवालात अल्कोहोलची पुष्टी झाली नाही. यावर आता नवा खुलासा झाला आहे. आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलण्यात आले, त्यामुळे रक्त तपासणी अहवालात दारूची पुष्टी झाली नाही. या प्रकरणी पोलिसांनी फॉरेन्सिक विभागाचे एचओडी आणि एका डॉक्टरला अटक केली आहे. याप्रकरणी आमदार रवींद्र धंगेकर यांनी हसन मुश्रीफ यांच्या गंभीर आरोप केले.

Ghatkopar Hoarding Case । घाटकोपर होर्डिंग घटनेतील आरोपीला मोठा धक्का, कोर्टाने वाढवली पोलिस कोठडी

हसन मुश्रीफ यांच्या आशीर्वादाने ससून रुग्णालयामध्ये २ डॉक्टर काम करत होते असा गंभीर आरोप धंगेकर यांनी केला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान याबाबत हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रवींद्र धंगेकर यांनी माझ्यावर केले आरोप खोटे आहेत त्यामुळे त्यांनी दोन दिवसात माफी मागणी अन्यथा अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असा इशारा मुश्रीफ यांनी दिला आहे.

Porsche Car Accient । पुणे पोर्श दुर्घटनेवर उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे पालकांना विशेष आवाहन, म्हणाले, “स्वातंत्र्याच्या नावाखाली…”

हसन मुश्रीफ म्हणाले, रवींद्र धंगेकर यांना मी चांगला नेता समजत होतो मात्र ते प्रसिद्धीसाठी असे स्टंट करतील असे मला वाटले नाही. ज्यावेळी हे प्रकरण घडले त्यावेळी मी परदेशात होतो. मी माध्यमांवर ही बातमी वाचली असल्याचं हसन मुश्रीफ म्हणाले आहेत.

Ajit Pawar । ‘अजित पवारांचा उमेदवार निवडणूक येऊ नये म्हणून मुख्यमंत्री शिंदेंनी रचलं षडयंत्र…’, धक्कादायक दाव्याने उडाली खळबळ

Spread the love