Ravindra Dhangekar । रवींद्र धंगेकर यांचा सर्वात मोठा खळबळजनक आरोप

Ravindr Dhangekar

Ravindra Dhangekar । पुणे शहरामध्ये गुन्हेगारी सोबतच ड्रग्ज तस्करीचे प्रमाण देखील दिवसेंदिवस वाढत चालले आहे. पुण्यात पब मध्ये ड्रग्ज मिळतात पुण्याची ओळख उडता पंजाब सारखी होत चालली आहे. पुण्यात हुक्का पार्लर संस्कृती बंद व्हावी अशी मागणी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केली आहे. चार हजार कोटींचे ड्रग्ज सापडणे म्हणजे पुणे पोलिसांचे अपयश आहे असा आरोप काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी पोलिसांवर केला आहे. (Pune Crime )

Sanjay Raut । “…म्हणून पवारांचे घड्याळ काढून घेतलं” नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

पुण्यात पब नकोतच अशी भूमिका काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी मांडली आहे. पुणे जिल्ह्यात ड्रग्ज बनवण्याचा कारखाना मिळाला ललित पाटील प्रकरणाचा तपास देखील सरकारने पूर्ण केला नाही. ललित पाटील प्रकरणाच्या वेळीच मी म्हणालो होतो की, याचा संबंध आंतरराष्ट्रीय रॅकेटशी आहे. पुण्यामध्ये अनेक ललित पाटील कार्यरत असल्याचे देखील धंगेकर यांनी म्हणाले आहे.

Accident News । अंगावर काटा आणणारा अपघात; नियंत्रण सुटल्याने कार थेट दरीत कोसळली; ६ जणांचा भयानक अंत

त्याचबरोबर पब संस्कृती ही पुण्यात नसावी हे पुणेकरांचे मत आहे. चार हजार कोटी रुपयांचे ड्रग सापडणे म्हणजे पुणे पोलिसांचे अपयश आहे. कारण पोलिसांची यंत्रणा काय करते? गुप्तचर यंत्रणा आणि पोलिसांची एलसीबी काय करतायेत? असा आरोप आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे.

Manoj Jarange । अजय महाराज बारस्करांच्या सर्व आरोपांवर मनोज जरांगे यांनी दिल स्पष्टीकरण; म्हणाले…

Spread the love