Ravindra Dhangekar । पुणे पोर्श कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुरेंद्र अग्रवाल यांनी ड्रायव्हरला धमकावले आणि त्याला घरी जाऊ दिले नाही. चालकाने सुरेंद्र अग्रवाल विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली असून, त्या आधारे सुरेंद्र अग्रवाल यांच्यावरही अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. या अपघात (Pune Accident) प्रकरणाला आता अनेक वेगवेगळे फाटे फुटू लागले आहेत. अशातच आता काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी यामध्ये उडी घेतली आहे.
रवींद्र धंगेकर यांनी पुण्यातील पबमधील पोलीस कॉन्स्टेबल यांचे फोटो सोशल मीडियावर ट्विट केले आहेत. (Pune Accident) यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.
रवींद्र धंगेकर यांनी ट्विट करत लिहिले की, “राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना मी एक गोष्ट लक्षात आणून देऊ इच्छितो , कल्याणीनगर अपघातानंतर तपासात अक्षम्य चुका होऊन देखील पुणे शहराचे पोलीस कमिश्नर अमितेश कुमार यांना अजूनही कोणी दोषी आहेत असे वाटत नाही. अर्थात जो स्वतःच बिल्डरच्या पाकिटावर काम करतोय तो कसा कुणावर कारवाई करणार…? असो, आजपासून मी तुम्हाला दररोज एका पोलिस स्टेशनवर सुरू असलेल्या गैर-कारभाराची कथा पाठवणार आहे.
दिवस १ला – मुंढवा पोलीस स्टेशन हे पोलीस स्टेशन अवघे ३ कर्मचारी चालवतात. त्यापैकी निलेश पालवे ,काळे हे कॉन्स्टेबल सर्व पब्स ,हॉटेल येथून हप्ते गोळा करण्याचे काम करतात. सोबत एक फोटो जोडत आहे ज्यात हे वसुली कॉन्स्टेबल #वॉटर्स नावाच्या पबमध्ये पार्टी करतांना दिसून येत आहेत. आम्हा पुणेकरांच्या वतीने आपणांस विनंती आहे की,पुणे बिघडविणाऱ्या या पोलीस कॉन्स्टेबलची यांची तातडीने चौकशी करत यांना निलंबित करा ,अन्यथा ४८ तासात यांचे इतर व्हिडिओ देखील असेच ट्विट करण्यात येतील. पुन्हा भेटुयात नव्या पोलीस स्टेशनचा ग्राउंड रिपोर्ट घेऊन. जय हिंद ,जय पुणेकर..! असं ट्विट रवींद्र धंगेकर यांनी केलं आहे.
Ajit Pawar । पुणे पोर्श कार अपघातावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना मी एक गोष्ट लक्षात आणून देऊ इच्छितो , कल्याणीनगर अपघातानंतर तपासात अक्षम्य चुका होऊन देखील पुणे शहराचे पोलीस कमिश्नर अमितेश कुमार यांना अजूनही कोणी दोषी आहेत असे वाटत नाही. अर्थात जो स्वतःच बिल्डरच्या पाकिटावर काम करतोय तो कसा कुणावर… pic.twitter.com/GP7uIC0JTk
— Ravindra Dhangekar Official (@DhangekarINC) May 24, 2024