Site icon e लोकहित | Marathi News

कसब्याचे नवनिर्वाचीत आमदार रवींद्र धंगेकर फक्त आठवी पास, ‘एवढ्या’ संपत्तीचे आहेत मालक; वाचा सविस्तर..

Ravindra Dhangekar, the newly elected MLA of the town, owns only 8th pass, 'so much' wealth; Read in detail..

मागील काही दिवसांत पुण्यात कसबा चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचे (Assembly Elections 2023) वारे वाहत आहे. भाजप व महाविकास आघाडीसाठी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची ठरली असून नुकताच कसबा विधानसभा मतदारसंघाचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा दणदणीत विजय झाला असून भाजपचे हेमंत रासने पराभूत झाले आहेत. या निकालाने भाजपला ( BJP) मोठा धक्का बसला आहे.

मोठी बातमी! नागालँडमध्ये देखील राष्ट्रवादीचाच डंका

तुम्हाला एकूण आश्चर्य वाटेल पण पुण्यातील कसबा भागाचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांनी फक्त आठवीपर्यंत शिक्षण घेतले आहे. कसबा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी निश्चित झाल्यानंतर रवींद्र धंगेकर यांनी निवडणूक आयोगाला संपत्तीबाबत माहिती पुरवली होती. यानुसार धंगेकर यांच्याकडे एकूण ७.२० कोटींची संपत्ती आहे.

टायगर श्रॉफचे खरे नाव तुम्हाला माहित आहे का? आपल्या लेकाच्या नावाबद्दल जॉकी श्रॉफ यांनी केला मोठा खुलासा

दरम्यान, कसबा मतदारसंघात मागच्या 28 वर्षांत भाजपचे वर्चस्व होते. सदाशिव पेठ, नारायण पेठ आणि शनिवार पेठ या मूळ ब्राम्हणकेंद्रीत पेठांमध्ये या निवडणुकीत भाजपला अक्षरशः डावलले गेले आहे. जवळजवळ मागील अनेक वर्षांचा इतिहास मोडीत काढत महाविकास आघाडीच्या रवींद्र धंगेकरांनी कसबा मतदारसंघात ऐतिहासिक विजय मिळवला आहे.

रामदास आठवलेंच्या पार्टीचा नागालँड मध्ये डंका; विधानसभा निवडणुकीत मिळवला दोन जागांवर विजय

Spread the love
Exit mobile version