कसब्यात जिंकले रवींद्र धंगेकर मात्र सोशल मीडियावर चर्चा बिचुकलेंना मिळालेल्या मतांची!

Ravindra Dhangekar won in the town, but the votes received by Bichukale are discussed on social media!

मागील काही दिवसांत पुण्यात कसबा चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचे (Assembly Elections 2023) वारे वाहत आहे. भाजप व महाविकास आघाडीसाठी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची ठरली असून नुकताच कसबा विधानसभा मतदारसंघाचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा दणदणीत विजय झाला असून भाजपचे हेमंत रासने पराभूत झाले आहेत.

कसब्याचे नवनिर्वाचीत आमदार रवींद्र धंगेकर फक्त आठवी पास, ‘एवढ्या’ संपत्तीचे आहेत मालक; वाचा सविस्तर..

मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेते अभिजित बिचुकले यांनी कसबा मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र या निवडणुकीत अभिजित बिचुकले यांना अवघी चार मते मिळाली आहेत. अगदी दोन आकडी मते मिळवण्यात सुद्धा अयशस्वी ठरल्यानंतर अभिजित बिचुकले यांना सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.

मोठी बातमी! नागालँडमध्ये देखील राष्ट्रवादीचाच डंका

आपण मोठ्या मताधिक्याने निवडणूक येऊ अस म्हणणारे बिचुकले निवडणूकित तोंडावर आपटल्याने त्यांची चर्चा सुरू असून त्यांचे मिम्स देखील व्हायरल होत आहेत. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर धंगेकरांपेक्षा बिचुकलेंचीच चर्चा चालू आहे.

टायगर श्रॉफचे खरे नाव तुम्हाला माहित आहे का? आपल्या लेकाच्या नावाबद्दल जॉकी श्रॉफ यांनी केला मोठा खुलासा

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *