Site icon e लोकहित | Marathi News

भाजपने पोलिसांना हाताशी घेऊन कसब्यात पैसे वाटले, रविंद्र धंगेकरांचा गंभीर आरोप; कसबा गणपतीसमोर आज करणार उपोषण

Ravindra Dhangekar's serious allegation that BJP took the police hand in hand and distributed money in the village; Fasting will be done in front of Kasba Ganapati today

कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचाराची काल संध्याकाळी 5 वाजता सांगता झाली. पुण्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेली प्रचाराची धावपळ आणि गोंधळ आता थांबला आहे. दरम्यान कसबा पोटनिवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर ( Ravindra Dhangekar) यांनी भाजपवर मोठा आरोप केला आहे. भारतीय जनता पक्षाने (BJP) पोलिसांना सोबत घेऊन पैसे वाटप केल्याचा आरोप धंगेकर यांनी केला आहे.

येत्या दोन दिवसात पुन्हा एकदा राजकीय भूकंप येणार? उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

याचा निषेध करण्यासाठी रविंद्र धंगेकर आज (ता.25 ) कसबा गणपतीसमोर उपोषण करणार आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार कसबा पेठेतील रविवार पेठ, गंज पेठ आणि बहुतांश भागात भाजपने पैशाचे वाटप सुरू केले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या संपूर्ण प्रकारात पोलिसही सहभागी आहेत असा गंभीर आरोप रविंद्र धंगेकर यांनी केला आहे.

नाशिकच्या पान हाऊसमध्ये मिळते चक्क दीड लाखांचे पान! खवय्यांची होते गर्दी

यामुळे आज सकाळी 10 वाजता रविंद्र धंगेकरांच्या उपोषण आणि धरणे आंदोलनला सुरुवात होणार आहे. यासाठी महाविकास आघाडीचे इतर कार्यकर्ते सुद्धा उपस्थित राहणार आहे. कसब्यात रविंद्र धंगेकरांनी भाजपच्या हेमंत रासने ( Hemant Rasne) यांच्या विरोधात तगडे आव्हान उभे केल्याने भाजपने पैसे वाटून नवीन डाव टाकल्याची चर्चा सध्या कसबा मतदारसंघात सुरू आहे.

ठाकरे गट व आम आदमी पार्टी एकत्र येणार? उद्धव ठाकरे व केजरीवाल यांनी केलं सूचक वक्तव्य

Spread the love
Exit mobile version