मुंबई : महाराष्ट्रातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी आणि कर्मचारी फोनवर हॅलो न म्हणता वंदे मातरम् म्हणत संभाषणाला सुरुवात करतील,” अशी घोषणा सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केली. मात्र त्यांच्या या घोषणेनंतर वाद निर्माण होत आहेत. रझा अकादमीने (Raza Academy) या घोषणेला विरोध केला आहे.
काय म्हणाले रझा अकादमी?
“आमच्यामध्ये फक्त आणि फक्त अल्लाहची पूजा होते. त्यामुळे वंदे मातरम ऐवजी दुसरा पर्याय द्यावा .जो सर्वांना मान्य असेल. याबाबत मुस्लीम उलेमा आणि इतर संबंधितांशी चर्चा करुन राज्य सरकारला पत्रही लिहणार असल्याचे रझा नूरी म्हणाले”.
मुनगंटीवारांचा आदेश –
रखडलेले मंत्रिमंडळाचे खातेवाटप दोन दिवसांपूर्वी झाली. यावेळी सांस्कृतिक खात्याची जबाबदारी सुधीर मुनगंटीवार यांच्यावर सोपवण्यात आली. जबाबदारी येताच सुधीर मुनगंटीवारांनी मोठी घोषणा केली. हॅलो हा विदेशी शब्दाऐवजी शासकीय कार्यालयांमध्ये यापुढे वंदे मातरम् म्हणत संभाषण सुरू करण्याचा आदेश मुनगंटीवारांनी दिला आहे.