Devednra Fadanvis । नागपूर : राजकारणात आपल्याला नेहमीच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष पाहायला मिळतो. अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये (NCP) फूट पडून शिंदे- फडणवीस (Shinde- Fadnavis) सरकारमध्ये सहभागी झाल्याने मागील काही दिवसांपासून हा संघर्ष वाढला आहे. लवकरच लोकसभा (Lok Sabha) आणि विधानसभेच्या (Vidhansabha) निवडणुका पार पडणार आहेत त्यामुळे याचा परिणाम आपल्याला या निवडणुकांमध्ये पाहायला मिळेल. (Latest Marathi News)
Vidharbha Rain Update । मुसळधार पावसाने विदर्भात 48 तासात घेतला 8 जणांचा बळी, तर 30 नागरिक जखमी
आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devednra Fadanvis) आणि अजित पवार यांचा वाढदिवस आहे. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ठिकठिकाणी वाढदिवसाचे फलक लावण्यात आले आहेत. ही दोस्ती तुटायची नाय, राजकारणातील ‘दादा’ अजित दादा, राजकारणातील ‘चाणक्य’ देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, असा मजकूर नागपुरमधील एका बॅनर्सवर पाहायला मिळत आहे. (Devednra Fadanvis And Ajit Pawar Birthday)
Bike Loan | खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी! आता सोप्या पद्धतीने मिळणार दुचाकीसाठी कर्ज
सर्वात महत्त्वाचे म्हणजे या बॅनर्सवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा फोटो पाहायला मिळत आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. परंतु नागपुरमधील एक बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. शेतकऱ्यांना अवघ्या एक रुपयात पीक विमा देणारे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला कलंक की भूषण? असा सवाल त्यातून उपस्थित केला आहे.
विशेष म्हणजे हे बॅनर लावणाऱ्याचे नाव आणि फोटो नाही. तसेच त्यावर देवेंद्र फडणवीस यांचादेखीलही फोटो नाही. फक्त शेतकऱ्याचा मोठा फोटो असून ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.