मुंबई : उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे अशी माहिती समोर येत आहे. यामुळे महाराष्ट्रातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. पहिल्या टप्प्यामध्ये १५ ते १८ मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. या मंत्रिमंडळ विस्तारावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशातच मंत्रीपदाबाबत भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, “साईबाबांचा आशीर्वाद आपल्याला मिळाले आहेत. श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र आपल्याला साईबाबांनी दिला आहे. त्यामुळे जे त्यांच्या मनात आहे, ते होईलच”.
अजित पवारांनीही दिली प्रतिक्रिया –
अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, “उद्या मंत्रीमंडळ विस्तार होण्याची दाट शक्यता वाटते आहे. मात्र, विरोधी पक्षनेता म्हणून मला अधिकृतपणे कोणतीही माहिती मिळालेली नाही”. पुढे ते म्हणाले, “मागच्या बऱ्याच दिवसांपासून मंत्रीमंडळ विस्तार रखडलेला होता. तो लवकरात लवकर होईल, असचं सांगण्यात येत होत. मात्र, नुकताच त्यांना दिल्ली दौरा झाला आहे आणि आज त्यांची बैठक झाली आहे. त्यामुळे उद्या मंत्रीमंडळ विस्तार होण्याची दाट शक्यता आहे असं वाटत.”