Site icon e लोकहित | Marathi News

सोन्याचा मोबाईल सोन्याची कार वापरणाऱ्या पुण्याच्या गोल्डन गाईज बद्दल वाचा सविस्तर माहिती

Read detailed information about the Golden Guys of Pune who use gold mobile gold cars

बिगबॉसचे सगळेच सीझन कोणत्या न कोणत्या कारणाने गाजत असतात. सध्याचा बिगबॉस 16 (Big Boss 16) सुद्धा चांगलाच हिट ठरलाय. या सीझनमध्ये नुकतीच ‘गोल्डन गाईज’ ( Golden Guys) ची एन्ट्री झाली आहे. सनी वाघचोरे आणि बंटी गुर्जर अशी या गोल्डन गाईजची नावे आहेत. हे दोघेही सोन्याचे जाड-जाड दागिने घालून फिरतात. यासाठी ते विशेष प्रसिद्ध आहेत. करोडो रुपयांचे दागिने घालून फिरणारे बंटी आणि सनी यांच्याबद्दल लोकांमध्ये फार उत्सुकता आहे.

दोन जुळ्या बहिणींनी एकाच मुलासोबत केलं लग्न

बंटी गुर्जर व सनी वाघचोरे ( Bunty Gurjer & Sunny Waghchore) पुण्याचे रहिवासी असून ते कायम एकत्र फिरतात. लहानपणापासून सोबत राहत असल्याने ते एकमेकांचे चांगले मित्र आहेत. इतकंच नाही तर ‘आमच्यात मैत्री सोबतच बंधू प्रेम देखील आहे’, असे या दोघांचे म्हणणे आहे. या दोघांच्या एकमेकांवरील प्रेमाने यांना भरपूर प्रसिद्धी मिळाली आहे. यामुळे सोशल मीडियावर त्यांना गोल्डन गाईज म्हणून फार प्रसिद्धी मिळाली आहे.

कष्टकरी हातालाच देव भेटे; हेच बहिणाबाईंच तत्वज्ञान – इंद्रजीत भालेराव

अनेक चित्रपटांसाठी फायनान्सर व निर्माते म्हणून या दोघांनी काम केले आहे. यामुळेच सलमान खान, विवेक ओबेरॉय व इतर सेलिब्रिटींसोबत बंटी गुर्जर व सनी वाघचोरे यांचे फोटो प्रसिद्ध होत असतात. हे दोघेही एवढ्या वजनाचे सोने घालून कसे फिरतात हा सर्वच लोकांना प्रश्न पडला आहे ? यावर उत्तर देताना बंटी व सनी सांगतात की, “आम्ही लहानपणापासून सोने घालतो, त्यामुळे सरावाने आम्हाला त्याची सवय झाली आहे”. सनी रोज सात-आठ किलो सोने घालतो तर बंटी चार-पाच किलो सोने घालतो.

राज्यपाल कोश्यारींच्या विरोधातील पहिला बंद ‘या’ शहरामध्ये

Spread the love
Exit mobile version