अहमदनगर जिल्ह्यातील उद्यानविद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील तज्ज्ञ दत्तात्रेय जगताप (Dattatray jagtap) यांनी बहर धरणेबाबत माहिती दिली आहे. बहर धरणे म्हणजे झाडांना (trees) पाण्याचा ताण देऊन विश्रांती देणे अस ते म्हणाले. लिंबू (lemon) पिकाला बारमाही ओलित लागते. म्हणजेच वर्षातून तीन वेळा जानेवारी-फेब्रुवारी, जून-जुलै, आणि सप्टेंबर-ऑक्टोबर या महिन्यात अनियंत्रितपणे फुलोरा येतो. दरम्यान या फुलांचे प्रमाण अनुक्रमे 36, 15 व 49 टक्के एवढे असते. जरी लिंबूत विशिष्ट बहर धरणे शक्य असले तरी आर्थिकदृष्ट्या ते फायदेशीर ठरत नाही. कारण, एखाद्या विशिष्ट बहरासाठी ताण दिला, तर त्या वेळी अगोदरच्या बहराची फळे अपक्व स्थितीतच गळून पडतात.
MPSC: आता एमपीएससीतून होणार लिपिक पदाची भरती, मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला महत्वपूर्ण निर्णय!
आंबे बहर घेतल्यास झाडावर हस्त बहराची फळे वाटाण्याएवढी असतात, ती पाण्याच्या ताणामुळे गळून जाण्याचा धोका असतो. जुलै-ऑगस्ट या महिन्यांमध्ये 60-65 टक्के फळे मिळतात. दरम्यान कागदी लिंबू फळांना उन्हाळ्यात चांगला भाव मिळतो. लिंबू लागवडीचे अर्थशास्त्र हे प्रत्येक बहरापासून मिळणारे उत्पादन व बाजारभाव यावर अवलंबून असते.
मार्च, एप्रिल व मे महिन्यात लिंबू फळांना मागणी जास्त असते. तसेच एप्रिल व मे महिन्यात लिंबू फळांचे उत्पादन घेण्यासाठी हस्त बहराचे नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तसेच हस्त बहर धरण्यासाठी कागदी लिंबू झाडांना ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पाण्याचा ताण द्यावा लागतो; परंतु या वेळी जर पाऊस असेल तर बागेला ताण बसत नाही आणि हवामान प्रतिकूल असल्यास फुलोऱ्याचे प्रमाण कमी मिळते.
BJP: “…तर ठाकरे सरकार कधीच कोसळलं नसतं”; भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचा दावा
तसेच सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये फुलोऱ्याचे प्रमाण फक्त 10 ते 15 टक्के असते. फुलोऱ्याचे प्रमाण वाढविण्यासाठी ऑगस्ट महिन्यामध्ये सायकोसिल या संजीवकाच्या 1000 पी.पी.एम. तीव्रतेच्या दोन फवारण्या एका महिन्याच्या अंतराने करून ऑक्टोबरमध्ये एन.ए.ए. या संजीवकाची 10 ते 15 पी.पी.एम.तीव्रतेची फवारणी करावी. राष्ट्रीय लिंबूवर्गीय फळे संशोधन केंद्र, नागपूर येथे घेण्यात आलेल्या प्रयोगामध्येही सायकोसिल या संजीवकाच्या 1500-2000 पी.पी.एम.च्या ऑगस्ट महिन्यात दोन फवारण्यांची शिफारस केलेली आहे.
15 ऑक्टोबरपासून सुरू होणार ऊस गाळप हंगाम,यंदा 3,050 रुपये एफआरपी