
तुर्कस्तान आणि सीरियामध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपामुळे मोठी नासधूस झाली. दोन्ही देशांमध्ये 28 हजार लोकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. हा आकडा आणखी वाढू शकतो असेही बोलले जात आहे. दोन्ही देशांमध्ये बचावकार्य सुरू आहे.
राज्यपालांच्या राजीनाम्यानंतर आदित्य ठाकरे यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, “महापुरुषांचा अपमान…”
भूकंपामुळे झालेली नासधूस कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. कारण बचावकर्त्यांना मृतांची संख्या आणखी वाढण्याची अपेक्षा आहे. पण याच दरम्यान एक अशी घटना घडली ज्याने संपूर्ण जग आश्चर्यचकित झाले.
तुर्कस्तानच्या हाताय प्रांतात घराच्या ढिगाऱ्याखालून एका नवजात अर्भकाला सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. 128 तासांच्या अथक परिश्रमानंतर मुलाला जिवंत बाहेर काढण्यात आले. या मुलाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर लोक या घटनेला चमत्कार म्हणत आहेत.
After 128 hours
— Bana Alabed (@AlabedBana) February 11, 2023
Today is the day of miracles.#earthquakeinsyria #EarthquakeInTurkiye pic.twitter.com/KxMOLNNsoY
मोठी बातमी! राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या खूप जवळच्या व्यक्तीचा कार अपघातात मृत्यू
भूकंपानंतर 128 तासांनंतर दक्षिण तुर्कीमधील एका इमारतीच्या ढिगाऱ्याखालून दोन महिन्यांच्या बाळाला सुखरूप बाहेर काढण्यात आले. या भूकंपामुळे हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्याचबरोबर नवजात बाळाला सुखरूप बाहेर काढणे हा निसर्गाचा चमत्कार असल्याचे बोलले जात आहे.
महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल रमेश बैस नेमके कोण आहेत? वाचा याबद्दल सविस्तर
दरम्यान, 6 फेब्रुवारी रोजी तुर्की आणि सीरियामध्ये 7.8 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. यानंतर जगभरातून दोन्ही देशांना मदतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. ऑपरेशन दोस्त अंतर्गत भारताने मदतीची रक्कम पाठवली आहे. भारताचे बचाव पथक तुर्की आणि सीरियामध्ये बचाव कार्य करत आहे.