देशात वेश्या व्यवसायांची काही कमी नाही. अनेक छोट्या-मोठ्या शहरांत हा व्यवसाय सुरु आहे. ठाणे जिल्ह्यात भिवंडी ( Bhivandi) येथे जिल्ह्यातील सर्वात मोठी वेश्या वस्ती आहे. याठिकाणी अनेक महिला सेक्स वर्कर (Sex Workers) म्हणून काम करतात. मात्र या महिलांना काही गुंडांकडून सतत त्रास दिला जात होता. या पार्श्वभूमीवर कारवाई करत पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. यासाठी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) खास सापळा रचला होता.
लग्नाला तीन महिने होऊनही पतीचा शारीरिक संबंध ठेवण्यास नकार! पीडितेने गाठले थेट पोलिसस्टेशन
हे चारही गुन्हेगार शरीराची भूक भागविण्यासाठी वेश्या वस्तीत जात होते. मात्र येथील महिलांना त्यांच्यामुळे त्रास होत होता. याबाबत या महिलांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर एके दिवशी हे चारही गुंड कारमधून वेश्यावस्तीत येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या पार्श्वभूमीवर सापळा रचत पोलिसांनी चारही गुन्हेगारांना अटक केले.
आशिष विनोद बर्नवाल, मोह. जुनैद मोह. नदीम कस्सार, अहमद अली हसन शा, अतिरुपती अजयकुमार पाणिग्रही अशी आरोपींची नावे आहेत. यांच्याकडे पोलिसांना एक गावठी कट्टा, एक पिस्तुल आणि एक जिवंत काडतूस या गोष्टी मिळाल्या. धक्कादायक बाब म्हणजे हे चारही आरोपी १८ ते २२ वर्षे वयोगटातील आहेत.
धक्कादायक! बारामतीमध्ये ३८ लाखांचे प्रतिबंधीत पदार्थ जप्त; पोलिसांनी केली मोठी कारवाई