मुंबई : राज्यातील शेतकरी राजा परतीच्या पावसामुळे चांगलाच अडचणीत सापडला आहे. कारण खरीप पिकांची (Kharip Crop) काढणी सुरु असताना पाऊस सुरू झाला. त्यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडत आहे. दरम्यान मिरची उत्पादक शेतकऱ्याची संततधार पावसामुळे (Heavy Rain) लाल मिरची काळी पडायला लागली आहे. त्यामुळे मिरची उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.
धक्कादायक! श्रीगोंद्यात गॅस लिकेज होऊन घराला आग; वाचा सविस्तर
नंदुरबार जिल्ह्यात लाल मिरचीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. नंदुरबार मंडईत मिरचीची सर्वाधिक खरेदी-विक्री होत असून, इतर राज्यांतूनही मिरचीला मागणी आहे. परंतु पावसामुळे लाल मिरची सुकलेली नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. पावसामुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून तातडीने मदत जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
काळया रंगाच्या ब्रा घातल्याने ब्रेस्ट कॅन्सर होतो का? तज्ञांकडून जाणून घेऊयात सत्य
राज्यातील अतिवृष्टीमुळे शेती पिकांवर मोठा परिणाम झाला आहे. मग यामध्ये राज्यातील नंदुरबार जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे कापूस आणि सोयाबीनचे तयार झालेले पीक उद्ध्वस्त झाले आहे. तसेच नंदुरबार जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये कपाशीची बहुतांश पिके पाण्यात बुडाली आहेत. त्यामुळे शेतात ठेवलेले पीक खराब झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
अल्पवयीन मुलीसोबत शिक्षकाने केले नको ते कृत्य; वाचा सविस्तर
तर दुसरीकडे लाल मिरचीच्या (Red Chili) पिकाचेही पावसामुळे नुकसान झाले आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या कापणी सुरू आहे. दरम्यान पाऊस आलाच तर शेतमाल सुरक्षित कसा ठेवायचा, अशी चिंता शेतकऱ्याला सतावत आहे. तसेच हवामान खात्याने 14 ऑक्टोबरपर्यंत पावसाची शक्यता वर्तवली आहे.
Viral Video: अरे हे काय? पाठीवर दप्तर टाकून चक्क कुत्रे पाहतायत स्कूल बसची वाट
शेतकऱ्यांच्या आशेचा हिरमुड
गेल्या दोन दिवसांपासून नंदुरबार जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. दरम्यान या पावसाचा फटका भातशेतीलाही बसला आहे. जिल्ह्यात कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी आधीच चिंतेत होता. दिवाळीत कापसाला चांगला दर मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. पण, पावसाने आशा धुळीस मिळवल्या.
Viral Video: भर मंडपात नवऱ्यानेच लावला बायकोचा सेक्स व्हिडीओ