पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवीन संसद भवनाचे उद्घाटन केले. या उद्घाटन सोहळ्यात अनेक पक्षांचे नेते सहभागी झाले होते, तर अनेक विरोधी पक्षांनी या सोहळ्यापासून अंतर ठेवले होते. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित नव्हते. नवीन संसद भवनाच्या उद्घाटनासंदर्भात शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
यंदाच्या वर्षी २५ हजार शेतकऱ्यांना मिळणार ट्रॅक्टरसाठी अनुदान; अर्जही झाले दाखल
नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावेळी ज्या पद्धतीने हवन करण्यात आले, बहुधार्मिक प्रार्थनांचे आयोजन करण्यात आले आणि ‘सेंगोल’ आणण्यात आले त्यावरही शरद पवार यांनी भाष्य केले. ते म्हणाले की मी हा कार्यक्रम सकाळी पाहिला. हे पाहिल्यावर वाटले की मी तिकडे न गेलेले बरे. उद्घाटन समारंभात काय घडले याची मला काळजी वाटते. असं ते म्हणाले आहेत.
सहा मुलांच्या आईवर प्रेमाचे भूत! प्रेमसंबंधांमुळे केला पतीचा खून…
त्याचबरोबर पुढे ते म्हणाले, तेथे जे काही घडले ते पंडित नेहरूंच्या समाजाच्या दृष्टीच्या विरुद्ध आहे, त्यांना आधुनिक विज्ञानाच्या आधारे उभारायचे होते. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींना निमंत्रित करणे ही सरकारची जबाबदारी आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला उपस्थित होते, पण राज्यसभेचे प्रमुख, उपाध्यक्ष जगदीप धनखर उपस्थित नव्हते. त्यामुळे हा संपूर्ण कार्यक्रम मर्यादित लोकांसाठीच होता असे दिसते.
बापरे! भर रस्त्यामध्ये ‘या’ व्यक्तीने केला उर्फी जावेद हिला प्रपोज