Reliance Electric Car । मुकेश अंबानी करणार बडा धमाका, इलेक्ट्रिक कार बाजारात रिलायन्सची एंट्री

Reliance Electric Car

Reliance Electric Car । इंधनाचे दर दिवसेंदिवस गगनाला भिडत आहेत. अनेकजण पर्यायी वाहनांचा वापर करत आहेत. याच कारणामुळे भारतीय बाजारात इलेक्ट्रिक वाहनांचा (Electric Car) वापर वाढला आहे. जवळपास सर्वच कार निर्मात्या कंपन्या आपली इलेक्ट्रिक वाहने बाजारात दाखल करत आहेत. या वाहनांना भारतीय बाजारात खूप मागणी आहे. (Latest marathi news)

Viral News । भटक्या कुत्र्याचा मुलावर हल्ला, व्हिडीओ पाहून तुम्हालाही सुटेल थरकाप

भारतीय बाजारात टाटा मोटर्सच्या वाहनांची विक्री जास्त होत आहे. अशातच आता रिलायन्स (Reliance Industries) देखील इलेक्ट्रिक कार बाजारात दाखल करणार आहे. मागील महिनाभरापासून रिलायन्स आणि टेस्लामधील अधिकाऱ्यांच्यात याबाबत चर्चा सुरु आहे. माहितीनुसार याच महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क (Elon Musk) भारतात येणार आहेत.

Lok Sabha Elections २०२४ । पुण्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर! शरद पवारांचा वळसे पाटलांना मोठा धक्का

नुकतीच केंद्र सरकारने इलेक्ट्रिक वाहनविषयीचे धोरण एका आठवड्यापूर्वीच जाहीर केले आहे. दरम्यान, या दोन्ही कंपन्या इलेक्ट्रिक कार निर्मितीसाठी कशा एकत्र येतात? त्यांचा संयुक्त उपक्रम काय? याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. रिलायन्सने देखील याविषयीचा खुलासा केला नाही. टेस्लाच्या इलेक्ट्रिक कारची निर्मिती त्यासंबंधीची सुविधा पुरविण्याचे काम रिलायन्स करेल.

Instagram Video । रिल्स बनवण्यासाठी तरुणीने जीव घातला धोक्यात, थेट झाडाच्या शेंड्यावर चढून केला डान्स; पाहा व्हायरल व्हिडिओ

भारतीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलला पर्याय देण्याचा प्रयोग मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. टेस्ला महाराष्ट्र, तामिळनाडू आणि गुजरात या राज्यात प्रकल्पासाठी योग्य जमीन शोधत आहे. जर बाजारात रिलायन्सची कार आली तर ही कार बाजारात उपलब्ध असणाऱ्या इतर कंपन्यांच्या कार्सला चांगलीच टक्कर देऊ शकते. कंपनीदेखील या कारमध्ये जबरदस्त फीचर्स देईल.

Sharad Pawar । शरद पवारांची मोठी खेळी, भाजपला धक्का

Spread the love