
महागाईत आणखी भर घालत दूध कंपन्यांनी दुधाच्या दरात वाढ केली आहे. गोकूळने दुधाच्या दरात लिटरमागे दोन रुपयांनी वाढ केली आहे. दुधाच्या वाढलेल्या दराचा परिणाम आता येत्या सणासुदीच्या काळात दिसून येणार आहे. दूध महाग झाल्याने त्याचा थेट परिणाम मिठाईवर (गोड पदार्थांवर) होणार आहे.
‘जागरूक पालक-सुदृढ बालक’ अभियानांतर्गत सरकारने स्वीकारले बालकांचे पालकत्व
गेल्या काही दिवसांपासून दुधाच्या (Milk Producer) दरात वाढ होत आहे. त्यामुळे दुध उत्पादकांचे अच्छे दिन येत आहेत. पण ग्राहकांना (customer)मोठा फटका सहन करावा लागणार आहे. आता गोकूळ (Gokul milk) दुध डेअरीच्या दरात वाढ झाली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात गोकूळच्या दुध दरात वाढ झाल्याने पुन्हा एकदा ग्राहकांचे कंबरडे मोडले जाणार आहे. म्हशीच्या दुध दरात 3 रुपयांनी वाढ झाली आहे. तर गाईच्या दुधात 2 रुपयांनी वाढ झाली आहे. पुणे, मुंबई, कोल्हापूर या ठिकाणी दुधाच्या दरात वाढ झाली आहे.
ब्रेकिंग! पुन्हा एकदा राजकीय भुकंप, ‘इतके’ आमदार करणार शिंदे गटामध्ये प्रवेश
यादरम्यान, नुकतीच झालेली दर वाढ 10 फेब्रुवारीपासून लागू करण्यात आली आहे. या दुधाच्या दरवाढीचा जरी सामान्यांना चटका बसणार असला तरी शेतकऱ्यांना मात्र याचा फायदाच होईल असा अंदाज आहे.
काय त्या ‘गौरी कुलकर्णी’च्या अदा; फक्त चाहतेच नाही तर सारेच झाले फिदा