मुंबई : सध्या देशात महागाई वाढत चालली आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य लोकांना चांगलाच आर्थिक फटका बसत आहे. केंद्र सरकारने खाद्य तेलावरील (Oil) सीमाशुल्क रद्द केल्यामुळे तेलाच्या आयातीत वाढ झाली आहे. यामुळे तेलामध्ये घसरण झाली आहे. तेलाचे दर २० ते २५ टक्क्यांनी दर उतरले आहेत. रशिया युक्रेन युद्धामुळे तेलाचे दर गगनाला भिडले होते. पण आता सरकारने तेलावरील सीमाशुल्क रद्द केले आहे. त्यामुळे सणासुदीच्या तोंडावर तेलाचे दर कमी झाले आहेत.
यावर्षी असे वाढवा तूर पिकाचे उत्पादन, वाचा सविस्तर..
देशात वर्षात २५० टन खाद्यतेलाचा वापर होत असून १४० टन तेलाचा साठा आयात केला जातो. अर्जेंटिना इंडोनेशिया येथून सध्या तेलाची आयात होत आहे. त्याचबरोबर युक्रेनमधून देखील सूर्यफूल तेलाची २० ते ३० टक्के आयात सुरू झाली आहे. एकूण गरजेपैकी ६० टक्के तेल आयात करण्यात येते. त्यामुळे तेलाच्या दरामध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे.
Ramdas Kadam: “नासक्या डोक्यातून नासके विचार येतात…”, रामदास कदमांचा भास्कर जाधवांवर हल्लाबोल
बाकी खाद्यतेलाची दर कमी झाले असले तरी अजून शेंगदाणा तेलाचे दर जास्तच आहेत. चीनमध्ये शेंगदाणा आणि त्याच्या तेलाची निर्यात मोठ्या प्रमाणात होत आहे. महाराष्ट्र व गुजरातमधून महिन्याला दोन हजार मेट्रिक टन शेंगदाणा तेलाची निर्यात होत आहे. त्यामुळे या तेलाचे दर वाढेलेलेच आहेत.
Ramdas Kadam: शिवसेना का फुटली?, रामदास कदमांचे वक्तव्य चर्चेत, म्हणाले…