मुंबई : शेतकऱ्याला (farmer) वेगवेगळ्या संकटांना सामोरे जावं लागत. त्यात मग अतिवृष्टी असो किंवा एखादी महामारी असो.दरम्यान राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाई (compensation for damages) देखील मिळत असते. अशातच राज्य सरकारकडून (state government) खरीप पिकातील नुकसानीची भरपाई मिळाल्याने शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटातून दिलासा मिळणार आहे. 2022 मध्ये शेतीवर हवामान बदलाचा सर्वात वाईट परिणाम झाला आहे. अतिवृष्टीमुळे (heavy rain) अनेक राज्यांमध्ये शेतातील पिके वाहून गेली आहेत. या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता.
सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! भाजीपाल्यांचे दर भिडले गगनाला; वाचा सविस्तर
याच नुकसानीची भरपाई म्हणून केंद्र आणि राज्य सरकारकडून पीक नुकसान भरपाईसाठी अनेक प्रयत्न केले जातात. दरम्यान महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना मोठी बातमी दिली आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत दिली जाईल. या योजनेत महाराष्ट्र राज्य शासनाबरोबरच व्यवस्थापन विभाग आणि केंद्र सरकारही शेतकऱ्यांना मदतीची रक्कम अदा करणार आहे.
Lumpy: लम्पी आजाराने घातले थैमान! पाहा महाराष्ट्रातील सद्यस्थिती
आता 17 सप्टेंबरपर्यंत नुकसान भरपाईची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठवली जाईल. तसेच नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत दिली जाणार आहे.महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रातील शेतकर्यांना अतिवृष्टीमुळे पिकाच्या नुकसानीसाठी प्रति हेक्टर मोबदला दिला जाईल. यामध्ये जास्तीत जास्त 3 हेक्टरपर्यंतच्या पिकाच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदतीची रक्कम दिली जाईल, त्याअंतर्गत शेतकऱ्यांना पीकानुसार 27 हजार ते 36 हजार प्रति हेक्टरपर्यंत आर्थिक मदत दिली जाईल. यामुळे याचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे.