पुणे: रब्बी हंगाममध्ये वाटाणा लागवड करून तुम्ही चांगले उत्पादन घेऊ शकता. दरम्यान अशातच आता मटर उत्पादक (Pea Growers) शेतकऱ्यांसाठी (Farmers )दिलासादायक बातमी आहे. पितृपक्ष पंधरवडा सुरू होण्याच्या आधीपासूनच मटरला चांगला दर मिळत आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Pune Agricultural Produce Market Committee) काल (28 सप्टेंबर) केवळ दहा क्विंटल मटरची आवक झाली. दरम्यान मटरला किमान भाव 7 हजार 500 तर कमाल भाव 15 हजार रुपये इतका मिळाला आहे.
इतर भाजी-पाल्यांचे दर
तसेच काल पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये इतर भाजीपाल्यांचे कमाल बाजार भावाबाबत बोलायचं म्हणल ते
तर भेंडीला 4 हजार, टोमॅटो 2 हजार 500, घेवडा 7 हजार, दोडका 4 हजार, हिरवी मिरची 4 हजार, गवार 6 हजार रुपये असे भाव मिळाले आहेत. इतकंच नाही तर आज शेवग्याला 10 हजार रुपयांचा कमाल भाव मिळाला आहे.
केंद्र सरकारने डीएपी आणि युरियाचे जाहीर केले नवे भाव; ‘इतक्या’ रुपयांना मिळणार युरियाची पिशवी
कालचा पालेभाज्यांचा दर
पालेभाज्यांच्या दराबाबत बोलायचं झालं तर कोथंबीर आणि मेथी या दोन्ही पालेभाज्यांना सध्या चांगला भाव मिळत आहे. मग यामध्ये कोथिंबीर शेकडा किमान भाव 700 कमाल भाव 2 हजार 500 असा भाव मिळत आहे. दरम्यान मेथीला शेकडा किमान भाव 1 हजार आणि कमाल भाव 2 हजार 500 रुपये इतका मिळाला आहे.
IAS: “… मग उद्या कंडोम देखील मोफत द्यावे लागतील”, आयएस अधिकाऱ्याचे वक्तव्य चर्चेत