दिल्ली : 2007 साली उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांना गोरखपूरमध्ये (Gorakhpur) द्वेषपूर्ण भाषण केले होते. आता त्यांना या प्रकरणी मोठा दिलासा मिळालाय. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणी निकाल देताना द्वेषपूर्ण भाषण दिल्याबद्दल त्याच्यावर कारवाई होणार नाही, असे म्हटले आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या (High Court) निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मान्यता दिली आहे.
2007 (गोरखपूर) दंगलीचा खटला यूपीचे मुख्यमंत्री योगी यांच्याविरोधात मागे घेण्यास आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने कोणताही आदेश दिला नव्हता. सीएम योगी यांच्या द्वेषपूर्ण भाषणामुळे अनेक दंगली झाल्या, ज्यामंडे 10 लोक मारले गेले, असा आरोप याचिकेत करण्यात आला होता. अलाहाबाद उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्यानंतर याचिकाकर्ते परवेझ परवाझ यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
‘I hate Indians’ म्हणत अमेरिकेत चार भारतीय महिलांवर हल्ला, आरोपी अमेरिकन महिला अटक
21 ऑगस्ट 2018 रोजी सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री योगी यांचा समावेश असलेले 2007 मधील गोरखपूर दंगल प्रकरण हटविण्याला आव्हान देणाऱ्या याचिकेवर उत्तर प्रदेश सरकारकडून उत्तर मागवले होते. पण तत्कालीन सरन्यायाधीश दीपक मिश्रा (Deepak Mishra) यांच्या खंडपीठाने नोटीस बजावली होती आणि राज्य सरकारकडून चार आठवड्यांत उत्तर मागितले होते. आज झालेल्या सुनावणीदरम्यान योगी यांच्या बाजूने उपस्थित असलेले ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी म्हणाले की, ट्रायल कोर्टाने क्लोजर रिपोर्ट स्वीकारला आहे. जो अलाहाबाद हायकोर्टाने कायम ठेवलाय.