हेल्मेट विकत घेताना ‘हे’ लक्षात ठेवाच! गोष्ट छोटी पण फायदा मोठा…

Remember this while buying a helmet! A small thing but a big benefit...

गाडीवरील सुरक्षित प्रवासासाठी हेल्मेट गरजेचे असते. हेल्मेटच्या वापरामुळे अनेकदा मोठा अपघात होऊनही डोक्याला इजा होत नाही. अपघाताचे ( Accidents) धोके टाळण्यासाठी भारत सरकारने हेल्मेट वापरावर सक्ती केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हेल्मेट घालणं हा वाहतुकीचा नियम आहे. हा नियम मोडला तर मोठा दंड देखील आकारला जातो. यामुळे दुचाकी खरेदी करताना, हेल्मेट देखील खरेदी केले जाते. मात्र, हेल्मेट ( Helmets) खरेदी करताना खालील गोष्टींचा नक्की विचार करा.

1) हेल्मेट खरेदी करताना नेहमी आरामदायी हेल्मेटच निवडावे. आपल्या डोक्याच्या पूर्ण संरक्षणासाठी फुल साइज हेल्मेट निवडणे आवश्यक आहे.

2) हेल्मेट विकत घेत असताना, ते हेल्मेट नक्की कोणत्या मटेरिअलचे बनले आहे. यावर आवर्जुन लक्ष द्या. तसेच प्लास्टिक पासून बनवलेले हेल्मेट घेणे टाळावे. कारण, ते पडले की फुटतात.

3) महत्त्वाची बाब म्हणजे पांढऱ्या व काळ्या व्हिजरचे हेल्मेट अधिक फायदेशीर ठरतात.

4) हेल्मेटची सुरक्षितता व मजबुतीच्या हमीसाठी आयएसआय (ISI) मार्क असणारे हेल्मेट खरेदी करावे.(Helmet with ISI mark)

5) हेल्मेट खरेदी करताना डिझाईन व लूक कडे लक्ष द्याच. मात्र comfort व टिकाऊपणा याला अधिक प्राधान्य द्या.

वाहतुकीचे नियम न पाळल्याने दिवसेंदिवस अपघातांच्या संख्येत वाढ होत आहे. अशात आपली सुरक्षितता ही आपली जबाबदारी असायला हवी. अपघाताच्या वेळी हेल्मेट संरक्षक कवचाचे काम करते. हेल्मेटमुळे आपले डोके, तोंड, नाव आणि चेहऱ्याचे रक्षण होते. हेल्मेट नसल्यास डोक्याला खूप खोल जखम होऊ शकते, काही वेळा जखम इतक्या गंभीर होतात की त्यामध्ये व्यक्तीचा मृत्यू देखील होऊ शकतो. म्हणून प्रवास करताना किंवा गाडी चालवताना हेल्मेट आवश्यक आहे. जर हेल्मेट इतके महत्त्वाचे असेल तर ते घेताना थोडी काळजी ही घ्यायलाच हवी. नाही का?

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *