खरीप हंगाम जून 2022 च्या नुकसान भरपाई मिळण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे तहसीलदार यांना निवेदन

Shrigonda news

गेल्या वर्षीच्या खरीप हंगाम जून 2022 मध्ये श्रीगोंदा तालुक्यात मांडवगण गटासह, बेलवंडी, कोळगाव आणि अन्य इतर गटात शेतकऱ्यानी खरीप पिकांची पेर केलेली होती. सर्व पिके व्यवस्थित आलेली होती. परंतु सततच्या पावसाने शेतकऱ्यांचा हाताशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला. शेतकऱ्यांनी इकडून तिकडून पै पै जमवून बी-बियाणे खते भरणा केला होता .ऐनवेळी पिके हातात येण्याच्या वेळेस शेतकऱ्यांचे सततच्या पावसाने प्रचंड आर्थिक नुकसान झाले.

Eknath Shinde । एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाबाबत केली मोठी घोषणा; आता कुणबी प्रमाणपत्र…

शेतीत पिकांच्यासाठी केलेला सर्व खर्च वाया गेला. त्यामुळे शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत सापडलेला असताना अजून वर्ष उलडून देखील शेतकऱ्यांना सरकारकडून कुठलीही आर्थिक मदत झालेली नाही. तरी तहसीलदार यांनी शेतकर्यांना मदत मिळविण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करून शेतकऱ्याना झालेल्या नुकसानीची आर्थिक मदत लवकरात लवकर मिळून द्यावी.

Uorfi Javed । धक्कादायक! निर्मात्याने फाडले उर्फी जावेदचे कपडे, जबरदस्ती करत…

अन्यथा शासन दरबारी संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा संभाजी ब्रिगेडचे शेतकरी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष संग्राम देशमुख यांनी निवेदना द्वारे दिला आहे.

Maharashtra Cabinet Decision | बिग ब्रेकिंग! कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सर्वात मोठा दिलासा, मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला मोठ निर्णय

Spread the love