
दौंड : दौंड तालुक्यातील यवत पोलीस स्टेशनसाठी जागा, दौंड पोलीस स्टेशन व उपविभागीय कार्यालयाच्या बांधकामासाठी निधी द्या. त्याचबरोबर पाटस पोलीस चौकीला स्वतंत्र पोलीस स्टेशन होण्याच्या प्रस्तावास मान्यता द्या. अशी मागणी दौंडचे विद्यमान आमदार राहुल कुल यांनी विधानसभेमध्ये इत्यादी मुद्दे मांडले आहेत.
अधिवेशनात बोलताना आमदार राहुल कुल म्हणाले, यवत पोलीस स्टेशनची १९८० साली झाली. या पोलिस स्टेशला पोलिस कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने त्याचबरोबर कार्यवाहीत सापडलेली वाहने लावण्यासाठी जागा उपलब्ध नाही, यवत पोलीस स्टेशनकडे सुमारे ५२ गावांचे, ३७ किमी महा मार्गालगतचे कार्यक्षेत्र आहे.
त्याचबरोबर उक्त गावांच्या हद्दीतून रेल्वे मार्ग, नदी, घाटरस्ते, वाढते औद्योगिकरण यामुळे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढत आहे. १९८० साली पोलीस स्टेशनचा विस्तार झालाय पण इमारत अजून जुनीच आहे.
राज्य शासनाने २४ डिसेंबर २०२१ रोजी पोलीस स्टेशन बांधकामासाठी ३ कोटी ५० लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलेला असून जागे अभावी अजून काम सुरु झालेलं नाही. त्यामुळे जागा मिळण्याबाबत शासनाने लवकरात लवकर कार्यवाही करावी. त्याचबरोबर दौंड पोलीस स्टेशन आणि उपविभागीय कार्यालय यांच्या बांधकामासाठी देखील निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आमदार राहुल कुल यांनी केली.