मुंबई : झी मराठीवरील (Zee Marathi) बस बाई बस (bas bai bas) हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या आवडीचा कार्यक्रम ठरू लागला आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमात दर आठवड्याला महाराष्ट्रातील (Maharashtra) नवनवीन प्रसिद्ध महिला प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. दरम्यान या आठवड्यात सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरूने (Rinku Rajguru) बस बाई बस कार्यक्रमात हजेरी लावली. या वेळी कार्यक्रमाचे अँकर सुबोध भावेसह (Subodh Bhave) महिला प्रवाशांनी रिंकूला अनेक प्रश्न विचारले. या प्रश्नांची उत्तर देत रिंकूनं सर्वांबरोबर मनमोकळेपणाने गप्पा मारल्या.
समाजमाध्यमांवरील या व्हायरल संदेशाने घातली दहशत, मुले चोरणारी टोळी ठरली अफवा
अभिनेत्री रिंकू राजगुरू ही सैराट या सिनेमात आर्चीच्या भूमिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली. सैराटमधील आर्चीचे फेमस डायलॉग, गाणी आणि तिचे शॉर्ट्स आजही प्रसिद्ध आहेत. चित्रपटातील आर्चीचा एक शॉर्ट पाहून सगळ्या तरूणी देखील आर्चीच्या प्रेमात पडल्या तो शॉर्ट म्हणजे आर्चीचा विहिरीत उडी मारण्याचा सीन. या सीनचं खरं सत्य रिंकूनं यावेळी सांगितलं.
तुम्ही अशी विहिरीत उडी मारली की….
बस बाई बसच्या मंचावरवरील महिला प्रवासांनी रिंकूला प्रश्न विचारताना म्हणाल्या की ‘तुम्ही अशी विहिरीत उडी मारली की सगळ्या पोरींना तुमचं कौतुक वाटलं. तुम्हाला आधीच पोहता येत होत की तुम्ही चित्रपटावेळी शिकलात?’.दरम्यान या प्रश्नाचं उत्तर देताना रिंकू राजगुरू म्हणाली की , ‘मला आधीपासूनच पोहायला येत होतं कारण मला माझ्या बाबांनी उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये पोहायला शिकवलं होतं. त्याचा उपयोग मला सैराटसाठी झाला . पण पाण्यात अशी उडी मी पहिल्यांदाच मारली होती. तेव्हा मला फार भिती वाटली होती’.
सकाळी पोट नीट साफ होत नाही? मग ‘हा’ करा उपाय, मिळेल मिनिटात आराम
रिंकू पुढे म्हणाली, ‘ मी शुटींगच्या वेळी म्हणत होते की, मी नाही करत हा शॉर्ट. तेव्हा ते मला म्हणायचे, ‘मारते की देऊ ढलकलून’, मग मी थोडा वेळा घेऊन तो सीन केला. पण पहिल्या 2 टेकमध्ये मी सीन कम्प्लिट केला होता. पहिल्या वेळी चेहऱ्यावर खूप टेन्शन होतं दुसऱ्या वेळी सीन पूर्ण केला’.रिंकूचा हा किस्सा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Eknath Shinde: पुण्यातील ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणेवर एकनाथ शिंदेनी दिली प्रतिक्रिया म्हणाले…