Riots in Satara । सातारा : अलीकडच्या काळात सोशल मीडियाचा (Social media) वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. मनोरंजन, माहितीसाठी आता फक्त सोशल मीडियाचा वापर केला जात नाही. तर याच्या माध्यमातून पैसेदेखील कमावता येऊ लागले आहेत. अनेकदा सोशल मीडियावर टाकलेल्या आक्षेपार्ह पोस्टमुळे (Offensive post) वाद निर्माण होतात. अनेकदा हे वाद खूप टोकाला जातात. (Latest Marathi News)
Manoj Jarange । अजित पवार यांना मनोज जरांगेंचं आवाहन; म्हणाले ‘पवारांनी चार-पाच…’
असेच काहीसे प्रकरण साताऱ्यात घडले आहे. साताऱ्यातील पुसेसावळी या गावात सोशल मीडियावर एक वादग्रस्त पोस्ट टाकण्यात आली होती. त्यावरून आता चांगलेच वातावरण पेटले आहे. वादग्रस्त पोस्ट टाकल्यामुळे दोन गटात तुंबळ हाणामारी झाली आहे. संतप्त जमावाने वाहने, दुकाने पेटवून दिली आहेत. तसेच एका समाजाच्या प्रार्थनास्थळाचीही तोडफोड करण्यात आली आहे. (Satara News)
World Cup 2023 । टीम इंडियाच्या चिंता वाढल्या! आशिया कप स्पर्धेदरम्यान बड्या खेळाडूला मोठी दुखापत
या घटनेत एक जणाचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर दवाखान्यात उपचार सुरु आहेत. जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यावरून या दंगलीची दाहकता समजते. या गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गावात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. सध्या पुसेसावळीसह खटाव तालुक्यामध्ये तणावपूर्ण शांतता आहे.
Crime News । सुखी संसारात पडला मिठाचा खडा अन् घडलं भलतंच.. जाणून तुम्हीही हैराण व्हाल