Rishabh Pant । मोठी बातमी! ऋषभ पंत याच्यावर कोसळला दु:खाचा डोंगर

Rishabh Pant. Big news! A mountain of grief fell on Rishabh Pant

टीम इंडिया सध्या विविध अडचणींचा सामना करत आहे. अगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यासाठी ( World Test Championship Finals) लवकरच भारतीय संघ तयारीला लागणार आहे. मात्र अनेक खेळाडू दुखापतींमुळे त्रस्त असल्याने टीम इंडियाच्या अडचणींत वाढ झाली आहे. दरम्यान टीम इंडियाचा स्टार खेळाडू ऋषभ पंत ( Rishabh Pant) हा सुद्धा अडचणीत असून त्याने सोशल मीडियावरून एक भावनिक आवाहन केले आहे.

LPG । घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीबाबत समोर आली मोठी अपडेट!

ऋषभ पंतने दिल्लीच्या सॉनेट क्रिकेट क्लबकडून क्रिकेटचे धडे घेतले आहेत. या खेळातील बारकावे तो तिथेच शिकला आहे. मात्र पंतचे प्रशिक्षक तारक सिन्हा ( Tarak Sinha) यांची ही अकादमी आता दिल्लीच्या व्यंकटेश्वर कॉलेजमधून काढली जात आहे. या क्लबला नुकतीच यासंदर्भात नोटीस मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर ऋषभ पंतने भावनिक ट्विट केले आहे.

Viral Video । अन् बायकोने नवऱ्याला मारायला सुरुवात केली; भर रस्त्यात झाला तमशा!

माझ्या क्लबची अशी अवस्था पाहून मला खूप वाईट वाटत आहे. अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू या क्लबमध्ये घडले आहेत. त्यामुळे या अकादमीचे कॉलेजमधून वगळणे निराशाजनक असणार आहे. हा क्लब माझ्यासाठी घरासारखा आहे. सॉनेट क्लब हा केवळ एक क्लब नसून ती एक वारसा संस्था आहे. त्यामुळे या निर्णयाबाबत फेरविचार करावा अशी मी व्यंकटेश्वर कॉलेजच्या प्रशासकीय मंडळाला विनंती करतो. असे ऋषभ पंतने म्हंटले आहे.

‘चला हवा येऊ द्या’ मध्ये येणार गौर गोपाळ दास! ‘या’ दिवशी दिसणार एपिसोड…

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *