
भारतीय क्रिकेट संघातील उत्कृष्ट् खेळाडू ऋषभ पंत (Rishabh Pant) याच्या गाडीचा ३० डिसेंबर रोजी भीषण अपघात झाला होता. या अपघातामध्ये खेळाडू ऋषभ पंत गंभीर जखमी झाला होता. यांनतर त्याच्यावर अनेक शस्त्रक्रिया देखील झाल्या. या दुखापतीतून सावरत असलेल्या ऋषभ पंतने अपघातानंतर पहिल्यांदाच एक मुलाखत दिली.
वयोवृद्द आजोबांनी बच्चू कडू यांची गाडी आडवली आणि म्हणाले, तुम्ही गद्दार…” पाहा VIDEO
ऋषभ पंत एका मुलाखतीत बोलताना म्हणाला की, ‘आता मी आयुष्याचा संपूर्णपणे आनंद घेण्यावर विश्वास ठेवतोय. काहीतरी विशेष प्राप्त करण्यासाठी आपण छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेण्याचे विसरून गेलो आहोत. या गोष्टी आनंद देत असतात.’ असं ऋषभ पंत यावेळी म्हणाला आहे.
उर्फी जावेदच्या ड्रेसचे नाव शीला की जवानी? व्हिडीओ पाहून चाहते म्हणाले…
त्याचबरोबर पुढे तो म्हणाला, , ‘अपघातानंतर मी कोवळ्या उन्हात बसण्याचा आनंद देखील घेत आहे. आपण आपले ध्येय प्राप्त करण्याचा नादात जीवनातील छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. हा एक माझ्यासाठी धडा होता.’ असं बोलत ऋषभने आयुष्याकडे एका नव्या दृष्टीकोणातून पाहत असल्याचे सांगितले.
आत्ताची सर्वात मोठी बातमी! कसब्यातुन रविंद्र धंगेकर विजयी होणार? एक्झिट पोल आला समोर