भारतीय क्रिकेट संघातील उत्कृष्ट् खेळाडू ऋषभ पंत (Rishabh Pant) याच्या गाडीचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामध्ये खेळाडू ऋषभ पंत गंभीर जखमी झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र आता त्याच्यावर उपचार झाले असून त्याची प्रकृती आता स्थिर असून तो धोक्याच्या बाहेर आहे.
क्रिकेटर पंतच्या तब्येतीबद्दल बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी दिली माहिती, म्हणाले…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हम्मादपुर जवळ रुरकीच्या नरसन सीमेवर वळण घेत असताना ऋषभच्या कारचा अपघात झाला. तो स्वतः कार चालवत असून त्याला डुलकी लागल्यामुळे अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार, ऋषभ पंत त्याच्या आईला भेटायला निघाला होता. दिल्लीहून रात्री उशिरा तो एकटाच त्याच्या कार मधून एकटाच निघाला होता.
जखमी अवस्थेत तडफडणाऱ्या ऋषभ पंतचा अपघातांनंतर सीसीटीव्ही फुटेज समोर; पाहा VIDEO
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस यंत्रणा दाखल झाली. माहितीनुसार, या अपघातामध्ये ऋषभच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. यामुळे त्याच्यावर प्लास्टिक सर्जरी देखील केली जाणार आहे.
ऋषभ पंतच्या अपघातानंतर उर्वशी रौतेलाची इंस्टाग्राम पोस्ट चर्चेत