ऋषभ पंत ऑस्ट्रेलिया मालिकेतून बाहेर; कोण होणार विकेटकीपर?

Rishabh Pant out of Australia series; Who will be the wicketkeeper?

भारतीय क्रिकेट संघातील उत्कृष्ट् खेळाडू ऋषभ पंत (Rishabh Pant) याच्या गाडीचा शुक्रवारी भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये खेळाडू ऋषभ पंत गंभीर जखमी झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र आता त्याच्यावर उपचार झाले असून त्याची प्रकृती आता स्थिर असून तो धोक्याच्या बाहेर आहे. ऋषभ पंत धोक्याच्या बाहेर असला तरी तो लगेच क्रिकेट खेळू शकत नाही. त्याला क्रिकेट खेळण्यासाठी बराच कालावधी लागणार आहे.

ब्रेकिंग! नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ‘इतक्या’ रुपयांनी एलपीजी गॅस सिलेंडर दरात वाढ

दरम्यान, फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत ऋषभ पंत खेळू शकणार नाही. मग ऋषभ पंतच्या जागेवर कोणता खेळाडू खेळणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. आता ऋषभ पंतच्या जागेवर केएस भरत, उपेंद्र यादव आणि ईशान किशन यापैकी एक खेळाडू खेळणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

शरद पवार आज इंदापूर दौऱ्यावर

माहितीनुसार, या अपघातामध्ये ऋषभच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. यामुळे त्याच्यावर प्लास्टिक सर्जरी देखील केली जाणार आहे. डॉक्टरांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार ऋषभ पंत २ ते ६ महिन्यांत बरा होऊ शकतो.

शेतकरी सुद्धा हेलिकॉप्टरमधून शेतात जाणार! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *