मागील वर्षी भारतीय क्रिकेट संघातील (Indian Cricket Team ) दमदार खेळाडू ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) कारचा भीषण अपघात झाला होता. दिल्लीहून डेहराडूनला घरी जात असताना ऋषभची कार पलटी झाली होती. यामध्ये ऋषभ पंत गंभीर जखमी झाला होता. मुंबईमधील (Mumbai) रुग्णालयात ऋषभवर उपचार सुरू असताना त्याची मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
वैष्णवी देवीला जाणाऱ्या गाडीवर काळाची झडप; भीषण अपघातामध्ये १० यात्रेकरूंचा जागीची मृत्यू , ५७ जखमी
यामुळे ऋषभ पंत यावर्षी ‘IPL 2023 ‘ मध्ये खेळू शकला नाही. तसेच अगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपला देखील त्याला मुकावे लागणार आहे. दरम्यान ऋषभ पंतवर लवकरच दुसरी शस्त्रक्रिया होणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र नवीन माहितीनुसार आता ही शस्त्रक्रिया होणार नाही. मागच्या चार महिन्यातील ऋषभची रिकव्हरी पाहून हा निर्णय घेण्यात आला आहे.
ब्रेकिंग! उद्या लागणार दहावीचा निकाल; ‘या’ ठिकाणी पाहा निकाल
मागच्या चार महिन्यात ऋषभ अतिशय वेगाने रिकव्हर होत आहे. त्यामुळे डॉक्टर्सची टीम खूपच खूश आहे. ऋषभची रिकव्हरी अशीच होत राहिली तर तो वेळेआधीच भारतीय क्रिकेट संघात पुनरागमन करू शकतो. सूत्रांच्या सांगण्यानुसार ऋषभ सध्या कुबड्यांच्या आधाराशिवाय चालू शकतो. यामुळे त्याचे मनोधैर्य वाढले आहे.