देशात सध्या आयपीएलचे वारे वाहत आहे. अशातच क्रिकेटप्रेमींना आता ऑक्टोंबर नोव्हेंबर मध्ये होणाऱ्या वन डे वर्ल्डकपचे (One Day World Cup) वेध लागले आहेत. यासाठी टीम इंडियाची ( Team India) जोरदार तयारी सुरू झाली आहे. वन डे वर्ल्डकपची टीम नुकतीच जाहीर झाली असून यामध्ये मागील काही दिवसांपासून ब्रेक वर असणाऱ्या अजिंक्य राहणेची वर्णी लागली आहे. मात्र भारताचा स्टार खेळाडू ऋषभ पंतला (Rishabh Pant) टीम मधून वगळण्यात आले आहे.
milk production: ‘हे’ चॉकलेट खाल्ल्याने जनावर देणार जास्त दुध; वाचा सविस्तर माहिती
मागील वर्षी डिसेंबर मध्ये झालेल्या अपघातात ऋषभ पंत जखमी झाला होता. या अपघातातून तो थोडक्यात बचावला होता मात्र गंभीर जखमी झाला होता. तेव्हापासून तो टीम इंडियामध्ये कोणताच सामना खेळलेला नाही. किमान येत्या वनडे मध्ये तो खेळेल अशी क्रिकेटप्रेमींना आशा होती. मात्र लोकांच्या या आशेवर देखील पाणी पडले आहे.
‘या’ कारणामुळे उर्फी जावेदला मुंबई मधील रेस्टॉरंटमध्ये प्रवेश नाही; वाचून बसेल धक्का
मीडिया रिपोर्टनुसार ऋषभ पंतला अपघातात अनेक ठिकाणी फ्रँक्चर झाले होते. यामधून तो वेगाने बरा होत आहे. मात्र तरीदेखील पूर्णपणे बरे होण्यास त्याला किमान सात-आठ महिने लागणार आहेत. यामुळे ऋषभ पंतचे क्रिकेटमध्ये कमबॅक होण्यासाठी वेळ लागणार आहे. कदाचित पुढील जानेवारीमध्ये तो टीम इंडियासाठी खेळू शकणार आहे.
आनंदाची बातमी! घरकुल योजनेतील लोकांना मिळणार मोफत वाळू; नवीन शासन निर्णय जारी