
भारतीय क्रिकेट संघातील उत्कृष्ट् खेळाडू ऋषभ पंत (Rishabh Pant) याच्या गाडीचा ३० डिसेंबर रोजी भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये खेळाडू ऋषभ पंत गंभीर जखमी झाला होता. आता रुग्णालयामधून पंतच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
बारामतीमध्ये ‘कृषीक 2023’ची जोरदार तयारी! 170 एकर परिसर होणार कृषिमय
ऋषभ पंतच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याच्या गुडघ्यावर नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे. त्याच्या दोन लिगामेंट शस्त्रक्रिया झाल्या असून बाकी लिगामेंट इंजरी आपोआप भरून येतील असं डॉक्टरांनी सांगितलं आहे मात्र, ऋषभ पंतला अजून दोन आठवडे रुग्णालयात ठेवावे लागणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
निवडणूक आयोग त्यांच्या घरचा आहे का? सुषमा अंधारे शिंदे गटावर आक्रमक
दरम्यान, ऋषभने स्वतः देखील त्यांच्या तब्येतीबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. ट्विट करत ऋषभने लिहिले की, “सर्व समर्थन आणि शुभेच्छांसाठी मी नम्र आणि कृतज्ञ आहे. माझी शस्त्रक्रिया यशस्वी झाली हे तुम्हाला कळवण्यास मला आनंद होत आहे. पुनर्प्राप्तीचा मार्ग सुरू झाला आहे आणि मी पुढील आव्हानांसाठी तयार आहे. बीसीसीआय, जय शहा आणि सरकारी अधिकाऱ्यांचे देखील मी मनापासून आभार मानत आहे.”
सामनाच्या पहिल्या पानावर पंतप्रधानांसह शिंदे-फडणवीस सरकारचा फोटो; राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण