चित्रपटसृष्टी मधील नावाजलेला अभिनेता म्हणजे रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) याने प्रत्येक मराठी माणसाच्या मनावरती राज्य केले आहे. त्याचे वडील व दोन्हीही भाव राजकीय कारकीर्तीमध्ये असून देखील रितेश हा चित्रपटसृष्टीकडे वळालेला आहे. रितेश आणि जेनेलिया हे सर्वांसमोर एक आदर्श जोडी मानली जाते. ३ फेब्रुवारी २०२२ रोजी दोघेही विवाह बंधनात अडकले. परंतु कित्येक वर्षानंतर रितेशने पहिल्या प्रेमाचा खुलासा प्रेक्षकांसमोर केला आहे. नुकतीच एका वृत्तवाहिनीला रितेश देशमुखने मुलाखत दिली. यावेळी रितेश देशमुखला प्रश्न विचारण्यात आला की तुमचं पहिलं प्रेम काय राजकारण की सिनेसृष्टी?
सावधान! ऑनलाइन गेमिंगच्या नादात तरुणाने गमावले तब्बल ४० लाख रुपये, जमीनही विकली
यावेळी रितेश देशमुख म्हणाला खरं सांगायचं झालं तर माझं पहिलं प्रेम हे राजकारण आहे. परंतु मला राजकारणामध्ये येण्याची अजिबात इच्छा नाहीये. पण माझे पहिले प्रेम हे राजकारणच आहे. मी राजकीय घराण्यामध्ये राहिलोय. आजूबाजूच्या सर्व गोष्टींचा अंदाज मला आहे. त्यामुळेच राजकारण हे माझं पहिलं प्रेम कायम राहील. ते माझं प्रेम अपूर्ण आहे असे मी म्हणणार नाही. व ते प्रेम पूर्ण व्हावे अशी देखील इच्छा नाहीये. परंतु राजकारणाविषयी प्रेम व आपुलकी नेहमीच राहील. तुमचे दोन्हीही बंधू अमित देशमुख व धीरज देशमुख आमदार आहेत मग तुम्हाला खासदार किंवा आमदार होण्याची इच्छा आहे? का असाही प्रश्न मुलाखतीदरम्यान विचारण्यात आला.
मोठी बातमी! भीमा पाटस कारखान्याप्रकरणी संजय राऊतांची दौंडमध्ये 26 एप्रिलला सभा
यावर उत्तर देत रितेश म्हणाला नाही व घराणेशाहीचा वाद यापुढे नको असे देखील म्हणाला. माझे जे काही स्वप्न आहे ते चित्रपटांमध्ये पात्रांद्वारे मी साकारेल व मी त्यामध्येच खूप खुश आहे असे देखील रितेश मुलाखती दरम्यान म्हणाला. तुम्ही भविष्यात कधी राजकारणामध्ये जाणार नाही का? असे विचारण्यात आल्यावर रितेश म्हणाला की भविष्यात काय होईल ते मला सांगता येत नाही. परंतु मला अभिनेता होयचं नव्हतं ती देखील संधी मला मिळाली. व गेली वीस वर्षे झाले मी सिनेसृष्टीत काम करतोय. ते काम मी मरेपर्यंत करावे अशी माझी इच्छा आहे.
राज्यात राजकीय भूकंप? अजित पवार अस्वस्थ, कधीही काहीही होऊ शकतं; शिंदे गटातील मंत्र्यांच मोठं वक्तव्य