Riteish Deshmukh Genelia । कुणीतरी येणार गं…! रितेश-जिनिलिया तिसऱ्यांदा होणार आई-बाबा? ‘त्या’ व्हिडीओवरून चर्चांना उधाण

Ritesh-Jinilia will become parents for the third time? 'That' video sparks discussions

Riteish Deshmukh Genelia । बॉलिवूडची सर्वात लोकप्रिय जोडी अर्थात अभिनेता रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) सतत कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेच्या केंद्रस्थानी येत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांचा ‘वेड’ (Ved) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. अनेक विक्रम या सिनेमाने केले आहेत. (Latest Marathi News)

Ajit Pawar । राज्याचे मुख्यमंत्री होणार का? खुद्द अजितदादांनी दिले स्पष्टीकरण

नुकतेच या जोडीने मुंबईतील एका इव्हेंटला हजेरी लावली होती. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) खूप व्हायरल होत आहे. (Riteish Deshmukh Genelia Deshmukh Video Viral) या व्हिडीओमध्ये जिनिलियाचे बेबी बंप दिसत आहेत. त्यावरून रितेश-जिनिलिया तिसऱ्यांदा आई-बाबा होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. इव्हेंटदरम्यान स्पॉट झाल्यानंतर जिनिलियाने पोटावर हात ठेवल्याने तिच्याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले. (Genelia Deshmukh Pregnancy)

Farmer Suicide । भयानक! दररोज 3 शेतकरी करतायत आत्महत्या, कृषिमंत्र्यांच्या जिल्ह्यात सर्वाधिक आकडा

पहा व्हिडिओ

जिनिलियाने जांभळ्या रंगाचा वनपीस तर रितेशने पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि आकाशी रंगाची पॅन्ट इव्हेंटसाठी परिधान केली होती. सोशल मीडियावर हा व्हिडीओ विरल भयानीने शेअर केला आहे. त्यावर रितेश-जिनिलिया तिसऱ्यांदा आई-बाबा होणार का? जिनिलिया पुन्हा आई होणार? जिनिलिया पुन्हा गुडन्यूज देणार आहे का? अशा विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

Breaking News | कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपीने येरवडा कारागृहात केली आत्महत्या

Spread the love