
लग्नाच्या वेळेचे नवरी नवरदेवाचे अनेक व्हिडीओ (Video) व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ असे असतात की ते पाहून आपण थक्क होतो तर काही व्हिडिओ असे असतात की आपल्याला हसू आवरत नाही. आता सध्या असाच एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. पण या व्हिडीओमध्ये जे घडले ते तुम्ही आजपर्यंत कधीच पाहिले नसेल.
अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी अजित पवारांनी व्यक्त केली खंत; म्हणाले…
या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की नवरा आणि नवरी वर मंडपात बसले आहेत आणि लग्नाचे विधी सुरू आहेत. नवरा आणि नवरी यांच्यामध्ये एक मोठी टोपली दिसत आहे. ज्यामध्ये पिवळे तांदूळ ठेवले आहेत. नवरा आणि नवरी दोघेही त्यांच्या हातात पिवळे तांदूळ घेतात आणि एकमेकांच्या डोक्यावर ठेवतात. पण अचानक एका माकडाने नवरदेवाच्या डोक्यावर उडी मारली, त्यानंतर माकडाने नवरीच्या देखील डोक्यावर उडी मारली आणि तेथून पळ काढला.
राहुल गांधी प्रकरणात केतकी चितळेची उडी; शरद पवारांच्या ‘त्या’ प्रकरणाचा उल्लेख करत म्हणाली…
हा व्हिडीओ telugu.beats_1_4_3 या इंस्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला 2 लाखांहून अधिक लाईक्स आले आहेत. व्हिडिओवर नेटकऱ्यांनी वेगेवेगळ्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. एका युजरने लिहिले, ‘याला देवाचा आशीर्वाद समजा’ अशा अनेक वेगेवेगळ्या कमेंट नेटकरी व्हिडिओवर करत आहेत.