Rituraj Singh । मनोरंजन विश्वाला मोठा धक्का! ऋतुराज सिंह यांचं निधन

Rituraj Singh

Rituraj Singh । मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला आहे. कारण लोकप्रिय अभिनेते ऋतुराज सिंह यांचं आज कार्डियाक अरेस्टने निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या ५९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. ऋतुराज सिंह यांच्या जाण्याने टीव्ही सृष्टीला खूप मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियावर (Social media) चाहत्यांनी आणि प्रेक्षकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. (Rituraj Singh passed away)

Manoj Jarange Patil । राज्य मागासवर्गाच्या अहवालावर जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया, म्हणाले; “मराठा समाजाला उपयोग..”

ऋतुराज सिंह यांचे जवळचे मित्र अमित बहल यांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली आहे. त्यांनी असे सांगितले की, ऋतुराज यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. तसेच त्यांना स्वादुपिंडाशी संबंधित समस्या देखील जाणवत होत्या. हिटलर दीदी, शपथ, रिश्ता क्या कहलाता है, होगी अपनी बात, ज्योती, वॉरियर हाय, आहट और अदालत, दिया और बाती हम यांसारख्या अनेक मालिकांमध्ये त्यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या.

Maratha Reservation । सर्वात मोठी बातमी आली समोर! मराठा समाजाला इतके टक्के आरक्षण मिळणार

सध्या ऋतुराज सिंह हे अनुपमा या मालिकेत काम करत होते. त्यांच्या निधनाच्या बातमीनं मालिकेमधील कलाकारांनाही खूप मोठा धक्का बसला आहे. तसेच त्यांनी रितु तड़प, बद्रीनाथ की दुलहनिया, आशिकी,मेरी आवाज ही पहचान है, सत्यमेव जयते, डर आणि बाजीगर या चित्रपटांमध्ये ऋतुराज सिंह यांनी महत्वाची भूमिका साकारली आहे.

MLA Ganpat Gaikwad | आत्ताच्या घडीची मोठी बातमी! भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या भावाच्या कार्यालयाची तोडफोड

Spread the love