Rain in Maharashtra | मागील काही दिवसांपासून पावसाने (Rain) राज्याकडे पाठ फिरवली होती. त्यामुळे बळीराजाच्या चिंतेत भर पडली होती. अशातच पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवरचे संकट टळले आहे. राज्यातील अनेक नद्यांनी धोक्याची पातळी (Heavy Rainfall) ओलांडली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. (Latest Marathi News)
Asia Cup 2023 | आज होणार महामुकाबला! टीम इंडिया उडवणार पाकिस्तानचा धुव्वा?
रायगडमध्ये मुसळधार पावसामुळे पाताळगंगा, कुंडलिका, अंबा आणि सावित्री या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. अलिबाग शहराला देखील मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. लोणावळ्यात देखील विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. सातारा येथील आंबोनळी घाटात पुन्हा एकदा दरड कोसळली आहे.
Weather Update । दिलासादायक! हवामान खात्याने दिला पुण्यासह ‘या’ 4 जिल्ह्यांना रेड अलर्ट
मागील दोन दिवसांपासून सतत कोसळत असलेल्या पावसामुळे महाड परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या शहराच्या सखल भागात, रस्त्यावर पाणी साचले असून शहराच्या जवळून वाहणाऱ्या सावित्री काळ, गांधारी या तीनही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली आहे. या शहरात पुराचे पाणी शिरत असल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
Cows Died । धक्कादायक! विषारी वैरण खाल्ल्याने ४ गाई दगावल्या
अशातच आज हवामान खात्याकडून (IMD) रायगड, पुणे, पालघर आणि सातारा या जिल्ह्यांत पावसाचा रेड अलर्ट तर रत्नागिरी, कोल्हापूर, यवतमाळ, ठाणे, नाशिक, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्र, विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Rahul Gandhi | हा लढा भाजपच्या विचारसरणीविरुद्ध, राहुल गांधी यांचा भाजपवर निशाणा