Riya Chakravarti: रिया चक्रवर्ती बद्दल कधीही न ऐकलेल्या गोष्टी वाचून तुम्हीही व्हाल थक्क; एकदा वाचाच

Riya Chakravarti: You will also be amazed to read the never-heard things about Riya Chakravarti; Read it once

सुशांत सिंग राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यूपासून संपूर्ण देशाला एक नाव परिचित आहे ते म्हणजे रिया चक्रवर्ती (Riya Chakravarti). रिया याआधी बॉलिवूड आणि इतरत्र दिसली असली तरी ती इतकी प्रसिद्ध अभिनेत्री नव्हती. तीचे अनेक कनेक्शन सुशांत सिंग राजपूतसोबत आढळून आले आणि अशा अनेक गोष्टी समोर आल्या ज्यामुळे रियाचे नाव चर्चेत आले. रियाचे नाव आज सर्वांना माहीत असले तरी तिच्या आयुष्याशी निगडित अनेक गोष्टी अजूनही लोकांना माहित नाहीत.

“आम्हाला पैसे नको जमिनी द्या…” रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध!

रिया चक्रवर्तीचा जन्म १ जुलै १९९२ रोजी एका आर्मी ऑफिसरच्या कुटुंबात झाला. तिचे सुरुवातीचे शिक्षण अंबाला कॅंट येथील आर्मी स्कूलमध्ये झाले. तिच्या वडिलांचे नाव इंद्रजित चक्रवर्ती आहे. तिला एक धाकटा भाऊ देखील आहे, त्याचे नाव शौक चक्रवर्ती आहे. रियाच्या आडनावामुळे अनेकांना रिया बंगाली आहे असे वाटते, पण तसे अजिबात नाही. तिचा जन्म कर्नाटक राज्यात झाला, पंजाबमध्ये शिक्षण घेतले आणि तिच्या करिअरसाठी ती मुंबईला आली.

भर पार्टीमध्ये सलमानच्या एक्स गर्लफ्रेंडने केलं असं कृत्य की सर्वजण पाहतच राहिले; पाहा Video

रियाने २००९ मध्ये MTV इंडियाच्या MTV Scooty Teen Diva या शोमध्ये भाग घेतला. यानंतर ती MTV ची सर्वात तरुण VJ ठरली. यानंतर तीने MTV वर MTV Gonein 60 Seconds, Pepsi MTV Wassup, TiktokCollegeBeat इत्यादींसह अनेक शो होस्ट केले.

Ajit Pawar: बारसू रिफायनरीबाबत अजित पवार यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जे लोक विरोध करत…”

यानंतर तिने तिच्या चित्रपट करिअरची सुरूवात ‘तुनिगा तुनिगा या तेलुगु’ चित्रपटातून केली. बॉलिवूडमध्ये ती पहिल्यांदाच यशराज फिल्म्सच्या मेरे डॅड की मारुती या सिनेमात दिसली. रियाने अनुष्का शर्माच्या बँड बाजा बारात या चित्रपटासाठी ऑडिशन देखील दिले होते.

राजकीय वर्तुळात नवीन ट्विस्ट! मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत आणखी एका नवीन नेत्याची वाढ…

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *