Crime News । अमरावती : सध्या राज्यात लूटमार, चोरी यांसारख्या घटना घडत (Crime) आहेत. यातून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे. कायदे कठोर करूनही या घटनांना आळा बसला नाही. सध्या असेच काहीसे प्रकरण समोर आले आहे. जनगणनेच्या बहाण्याने नायब तहसीलदाराच्या पत्नीला दिवसाढवळ्या लुटण्याचा प्रकार घडला आहे. (Latest marathi news)
Ajit Pawar । राज्यसभा निवडणुकीनंतर होणार मोठा भूकंप? अजित पवार गटाने आमदारांना दिल्या ‘या’ सूचना
मिळालेल्या माहितीनुसार, ही धकाकदायक घटना अमरावतीमध्ये (Crime in Amravati) घडली आहे. शहरातील राठी नगर परिसरात भरदिवसा दोन चोरटयांनी नायब तहसीलदारांच्या घरात चाकूचा धाक दाखवून लूट केली आहे. सरकार आणि प्रशासनाच्या वतीने जनगणना सुरू झाली आहे, असे सांगून दोघेजण घरात शिरेल. महिला पाणी आणण्यासाठी आत गेली असता, संधीचा फायदा घेऊन या चोरट्यांनी महिलेच्या मानेवर धारदार चाकू ठेवला.
Pankaja Munde । सर्वात मोठी बातमी! पंकजा मुंडे यांना दुखापत, रद्द केले आठवड्याभराचे कार्यक्रम
घरात जितकी कॅश, सोन-चांदीचे दागिने असतील ते काढून दे. जर तसं केलं नाही तर हा चाकू तुमच्या मानेवर चालवू, अशी त्यांना धमकी दिली. घाबरलेल्या महिलेने सोन्याचे दागिने, तसेच कॅश यासह 5 लाखांचा मुद्देमाल चोरांना दिली. चोरांनी सर्व रक्कम घेऊन त्यांनी धक्का देऊन महिलेला खाली पाडले आणि तेथून फरार झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अधिक तपास पोलीस करत आहेत.